नवीन लेखन...

एक होकार देऊया आपल्या आतल्या आवाजाला – २

२)प्रत्येकाला परमेश्वराने जन्म देताना आपआपला तळहात नि तेवढाच पसा दिला आहे.ज्याच्या त्याच्या ओंजळीत मावेल इतकंच पाणी त्याला पिता येतं.हव्यासापोटी कुणी कितीही ओरबाडून घागरभर पाणी पदरात पडून घेतलं,तरी पसाभर सोडून बाकी सारं वाहून जातं.अखेर जाताना तेवढा पसाभरही काही न्यायचा परवाना नाही ………या अनुभवातून आलेल्या शहाणपणावर आपल्याला आपलं नाव का बरं कोरता येऊ नये—–सतत काहीतरी मागणं मागत राहायचं हा माणसाचा स्वभाव त्याला कोठे घेऊन जाणार आहे कोणास ठाऊक….राजा मिडासाचे वशंज म्हणून अघोषित वारसाहक्कानं आपण सारे त्याचा वारसा चालवीत आलो आहोत….आपली गरज कुठे संपते नि हाव कुठे सुरु होते याची दखल घेणं आपणाला संयुक्तिक कधीच वाटत नाही….कारण आपण आपल्या डोळ्यावर माणुसकीच्या कफनाचे कापड ओढून कधीचे झोपेचे सोंग घेतलेले आहे…इथला विसावा काही पळाचा आहे हे माहित असूनही आपण आपल्या नावाच्या फरश्या दिसेल त्या मंदिरात लाऊन अमरत्व प्राप्तीचे ढोंग करीत असतो…त्या ढोंगास बळेच फसून नि हसून आपल्या अंगावर दानशूरपणाची शाल चढवून कोण कसा विश्वस्त म्हणून कसले कर्तव्य पार पाडत राहतो हे एका बालाजीलाच माहित….ज्या समाजात दोन रुपयाच्या लॉटरी तिकिटात झटपट लखोपती बनण्याचे स्वप्न – शासकीय आशीर्वाद घेऊन – खुले आम बाजारात वाटले जाते…त्या समाजात कठोर परिश्रम – नि उचित सबुरी या आळणी प्रसादाला कुणी भुकेला गरजू भिकारी देखील हाक देत नाही…सगळीकडे अवसरवाद बोकाळल्याने सगळ्या नेक शब्दांच्या व्याख्या पार बदलून गेलेल्या आहेत…सगळीकडे वावरताना कुणावर विश्वास ठेवावा नि कुणाच्या हाकेला ओ द्यावी याचा निर्णय न घेता आल्यामुळे काही वेळा सुक्याबरोबर ओलेही जाळले जाते…नि क़्वचित आपल्या हातून नकळत माणुसकीच्या गळ्याला नखही लावले जाते…इथल्या साऱ्या वस्तू माणसांनं माणसाच्या वापरासाठी निर्मिल्या आहेत…हे विसरून आपण त्या वस्तूंना जपण्याच्या (कि ज्यांच्यामुळे आपली छबी चार चौघात उठून दिसते..) नादात आपल्याच माणसांना वापरुन जातो …प्रसंगी असे निर्णय त्या संमोहित अवस्थेत घेतो कि परत कितीही चुकीचे वाटले तरी ते निर्णय नि त्यांचा झालेला परिणाम आपल्याला नाही उलटून टाकता येत …तेव्हा पुढच्या प्रवासास निघण्याची आपली सदैव तयारी असली पाहिजे नि तो प्रवास सुखरूप होऊन इच्छीत स्थळी मुक्कामास पोहोचण्यासाठी प्रवासात आपण आपल्या जवळ कमीत कमी ओझं बाळगलं पाहिजे …..१८.०४.२०१३

Avatar
About रजनीकान्त महादेव शेंबडे 11 Articles
रजनीकान्त महादेव शेंबडे..वास्तव्य कराड…अतिरिक्त कार्यकारी अभियंता म्हणून महावितरण इस्लाम्पूर विभागीय कार्यालयात कार्यरत.. लेखन कविता…ललित…स्फुट ..
Contact: Facebook

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..