एका धाग्याची रे वीण
एका नात्यात रे जिणं
गाठ बांधून पदरी
आले आता तुझ्या घरी
एका खोप्याचं जगणं
तुझं माझं काही देणं
जीव जीवाला जागलं
सारं मायेनं झाकलं
एका दु:ख काही घाव
दुजा सारखाच भाव
आता नाही रं वेगळं
सारं मीपण गळं
नातं नवं, नवी दिठी
पर अशी कायम राहो विटी
कुणी हटलं, म्हटलं
तरी राहो संग झाड वठलं!!
— वर्षा कदम.
Leave a Reply