नवीन लेखन...

एक परीस स्पर्श ( भाग – १८ )

मेनका त्याच्या आयुष्यात आलेली एकमेक मुलगी होती.  जी त्याची सच्ची मैत्रीण आणि प्रेयसी होती. विजयला माहित होते की तिचे त्याच्यावर प्रेम आहे पण तिला माहित नव्हते की विजयचेही तिच्यावर प्रेम होते. मेनका जर स्वतःच्या तोंडाने म्हणाली असती की तिचे त्याच्यावर प्रेम आहे! तर विजयने नक्कीच तिच्याशी विवाह केला असता. पण ती व्यक्त झाली नाही आणि विजयला व्यक्त व्हायचं नव्हतं. प्रेमात मुली सहसा पहिल्यांदा व्यक्त होत नाहीत हे विजयला उशीर कळले म्हणून अनामिका समोर त्याने त्याचे हृदय मोकळे करण्याचा प्रयत्न केला पण ते जमले नाही की ते तिला कळले नाही.  तेच विजयला कळत नव्हते. मेनका विजयच्या मित्राची म्हणजे जयची मावस बहीण होती. जय हा विजयचा त्याच्या आयुष्यातील एक नंबरचा मित्र!! तो जरी म्हणाला असता की मेनकाला तू आवडतोस तिच्याशी लग्न कर! तरी विजयने तिच्याशी लग्न केले असते. मेनका दिसायला खूपच सुंदर, गोरीपान, सडपातळ, भोळी, हसतमुख आणि मेहनती होती आणि तिचा आवाज खूपच गोड होता. एक दिवस विजय जयला भेटायला गेला असता विजयने तिच्याशी विजयची  ओळख करून दिली होती. पाहता क्षणी विजय तिच्या आणि ती विजयच्या प्रेमात पडली होती. ती एकमेव मुलगी होती जिचं विजयच्या घरी येणं जाणं होतं. ती विजयला फोनही करत असे.  जेंव्हा – जेंव्हा विजयच्या घरी येत असे तेंव्हा जयच्या घरीही येत असे.  त्याच्या बहिणीला भेटायला कारण त्या दोघींध्ये चांगली मैत्री झाली होती. एकदा विजयने हिंमत करून हॉटेलात तिच्या हातावर हातही ठेवला होता. पण तिने हात जराही हलवला नव्हता. तेंव्हाच खरं तर तिने तिच्या प्रेमाची कबुली दिली होती.

विजय आणि तिच्या प्रेमाच्या आड आली ती विजयची स्वप्ने! विजयला प्रसिद्ध व्यक्ती व्हायचं होतं. त्या दिशेने त्याचा प्रवास सुरूही झाला होता. त्यामुळे त्याच्या आयुष्यात बऱ्याच मुली येत होत्या. मेनकाचा विचार करता ती सर्व बाबतीत ठीक होती. फक्त एकच अडचण होती. ती शिकलेली नव्हती म्हणजे एकदम अशिक्षित नव्हती पण फक्त तोडकं मोडकं वाचण्या इतकीच शिकली होती. विजयने आपली आई अशिक्षित असल्यामुळे ज्या समस्या निर्माण झाल्या होत्या त्या जवळून पाहिल्या होत्या त्यामुळे अशिक्षित मुलीसोबत आयुष्य काढायला त्याच मन आणि हृदय धजावत नव्हतं.

तेंव्हाच विजय प्रेरणाच्याही प्रेमात होता.  हे जयला माहीत होतं. कदाचित त्यामुळेच त्याला जयच मेनकावर प्रेम असावं असं वाटलं नसेल. त्याच वेळी विजयच्या आयुष्यात आणखी एक मुलगी आली होती. तिच्यामुळे विजयच्या मनातील मेनका आणि प्रेरणावरील प्रेम डळमळीत झाले होते. त्यामुळे मेनकाला चालून आलेल्या स्थळाला ती हो! म्हणाली.  तीच लग्न झालं तिला दोन मुलं झाली आता ती तिच्या आयुष्यात आणि संसारात रमली. सुखी आहे की नाही हे विजयला माहीत नाही पण! विजयला त्याच्या आयुष्यात आपण कोणाचं हृदय तोडल्याच शल्य विजयला जाणवत असेल तर ते मेनकेचे होते.

आज जयेश विजयकडे एक पत्रिका घेऊन आला होता ती पत्रिका एका ३१ वर्षीय तरुणीची होती. विजय जयेश आणि त्यांना आता तिसरा भिडू मिळाला होता त्याच नाव होतं स्वप्निल ! स्वप्निल विवाहित होता, त्याचा प्रेमविवाह होऊन पाच वर्षे झाली होती. पण त्याला संतती  होत नव्हती. त्यामुळे तसे होण्याचे कारण त्याला ज्योतिष  शास्त्रात शोधायचे होते. तिघेही आपल्या परीने ज्योतिष शास्त्राचे जे ज्ञान मिळेल ते एकमेकात शेअर  करत होते. खरंतर ते ज्योतिष शास्त्राचीच परीक्षा घेत होते.  जयेशने ऑनलाईन ही मुलगी लग्नासाठी पाहिली होती. जयेशने पाहिली म्हणजे ती सुंदर असणार यात शंका नव्हती. पण जयेशला ती फोटोवरून थोडी रागीट स्वभावाची वाटलीच होती. तिच्या घरच्यांनी जुजबी बोलणी झाल्यावर त्यांच्या वयातील सहा वर्षाचे अंतर हे कारण देऊन नकार दिला होता. प्रत्यक्षात जयेशला  पंचवीशीतली पोरगीही सहज पटेल. उत्सुकता म्हणून जयेशने तिची पत्रिका विजयला दाखवली असता विजय म्हणाला,” ही मुलगी खूप रागीट असणार, विवाहानंतर हिचा घटस्फोट होऊ शकतो, हिच्या मनात आत्महत्येचे विचार आले असावेत, हिला संतती होण्यास समस्या निर्माण होऊ शकतात. हे सगळे ऐकल्यावर जयेश म्हणाला,” जो होता है अच्छे के लिये होता है.

जर त्या मुलीच्या घरच्यांनी वयाचे कारण देऊन जयेशला लग्नासाठी नकार दिला नसता तर त्यांचे लग्न झाले असतेच आणि पुढे जे घडायचे ते घडले असतेच.पण जयेशचे नशीब चांगले होते. विजयचा जादु – टोणा, तंत्र मंत्र याने भविष्य बदलता येते यावर विश्वास नाही. भविष्य कोणालाही बदलता येत नाही.  या मतावर विजय ठाम आहे. जयेशकडे करोडोची संपत्ती असतानाही तो स्वतःसाठी सुयोग्य पत्नी शोधू शकला नाही. शेकडो भेटल्या पण प्रत्येकीत त्याला काहींना काही दोष दिसलाच! विजयच्या आयुष्यात जितक्या आल्या ती प्रत्येक स्त्री त्याला काहीतरी चांगली आठवण देऊन गेली. त्यामुळे त्या प्रत्येकीची आठवण विजयच्या मनात आजही जिवंत आहे. विजयला खात्री आहे त्यांच्या मनातील आठवणीत त्यालाही एक जागा नक्कीच असेल. त्यांच्यापैकी कोणीही भेटली, आपल्या नवऱ्यासोबत असली तरी ती विजयशी बोलते कारण विजय चारित्र्य आजही तितकंच स्वच्छ आहे. जितकं पूर्वी होतं.

आजच विजय आणि स्वप्नील एकत्र बसले असता त्यांनी इंटरनेटवर एक पोस्ट वाचली. तूळ राशी अनुभवणार पुढची १० वर्षे राजयोग. ती वचुन विजय स्वप्नीलला विनोदाने म्हणाला, तुझ्या बायकोला लॉटरी काढायला सांग कारण ती तूळ लग्नाची होती. त्या पुढे जाऊन विजय म्हणाला, ” पाहू या! आता तरी माझा राजयोग फळाला येतो का ते ? नोकरी सोडून धंदा सुरू करण्याचे विचार आता विजयच्या मनात प्रबळ होऊ लागले होते. त्याला तसे योगही दिसत होते. पण त्याला हे पाहण्यात उत्सुकता होती की हे सारं नियती कसे घडवून आणते. विजय त्याच्या त्याच्या आजुबाजूच्या लोकांच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांचे सूक्ष्म निरीक्षण करत असतो. कोणतीही घटना मग ती कितीही छोटी असो! ती विनाकारण घडत नाही. हे विजय खात्रीने सांगू शकत होता. विजयच्या आयुष्यात एकही माणूस विनाकारण येत नाही. ज्याचं भाग्य बदलणार असतं तोच विजयच्या आयुष्यात येतो. म्हणूनच विजयशी कोणाचीही ओळख अपघाताने नाही तर नशिबाने होते. म्हणूनच विजय आयुष्याच्या प्रवासात कोणातही गुंतत नाही. म्हणूनच त्याच्या आयुष्यात आलेल्या त्या सर्व त्यांच्या आयुष्यात सुखी आहेत. भौतिक गोष्टी मिळविणे हे यशाचं परिमाण नाही हे विजयला चांगलं माहीत आहे. म्हणून त्याच्या आयुष्यात तो कोणतीही गोष्ट घडवून आणत नाही तर ती घडते.

— निलेश बामणे.

Avatar
About निलेश बामणे 421 Articles
Poet & Writer Editor - Marathi magzine Sahitya Upekshitanche
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..