नवीन लेखन...

एक परीस स्पर्श ( भाग – ११ )

विजयच्या जन्मकुंडळीत व्ययेश बुध सप्तमात आहे. त्यामुळे विजयच्या शब्दांना तलवारीसारखी धार आहे. त्याच्या शब्दांच्या तलवारीने अनेक लोक घायाळ होऊ शकतात म्हणूनच तो ती तलवार फक्त आणि फक्त अज्ञानी लोकांच्यावरच उपसतो. इतर वेळी तो खूपच शांतपणे आणि हसतमुख राहून बोलतो. विजयची  भाषा किती कठोर असू शकते याची कोणाला कल्पनाही येत नाही. विजयशी एखाद्या विषयावर वाद  घालणे म्हणजे पायावर धोंडा मारून घेण्यासारखे आहे. विजय मूर्खाला मूर्ख बोलायला अजिबात कचरत नाही. मग तो कोणी का असेना ? विजय कोणाच्याच चुकीच्या बोलण्याचे अथवा कृतीचे कधीच समर्थन करत नाही. विजयचे बोलणे कित्येकांना उद्धटपणा वाटतो. खरं तर विजयचं सहज बोलणंही एक विचार असतो हे लोकांना उशिरा लक्षात येतं.

विजयच्या भावाच्या संगणक क्लासमध्ये एक साठीचे गृहस्थ नेहमी संगणकावर काही कामे करून घेण्यासाठी येत असत. त्यांना विजयची ख्याती माहीत नव्हती. एक दोनदा त्यांनी विजयला तुझं लग्न झालं का ? म्हणून विचारलं. सवयीप्रमाणे विजयने सुरुवातीला दुर्लक्ष केले पण एक दिवस विजयला जिभेला धार असताना त्या गृहस्थाने तोच प्रश्न विचारल्यावर विजयने प्रतिप्रश्न विचारला, ” मला सांगा लग्न कशासाठी करायचं ? ते न केल्यामुळे माझं काही आडत नसताना. त्यावर ते गृहस्थ म्हणाले, ” आयुष्यात साथ द्यायला कोणीतरी हवे ! त्यावर विजय शांतपणे म्हणाला, ” हे तुमचे म्हणणे मला काही पटत नाही ! आयुष्यभर कोणाचीतरी साथ मिळावी म्हणून लग्न करतात हे मी मान्य करणार नाही.  त्याऐवजी तुम्ही असे म्हणाला असतात की आपली शारीरिक, मानसिक आणि सामाजिक गरज भागविण्यासाठी कोणीतरी पाहिजे म्हणून लग्न करायला हवं ! तर ते मी मान्य केलं असतं पण तुम्ही हे जे बोलता आहात की आयुष्यात कोणाचीतरी साथ हवी म्हणून लग्न करायला हवे हे चुकीचे आहे कारण कोणी कोणालाच आयुष्यभर साथ देऊ शकत नाही. दोघांपैकी एक अगोदर जाणारच त्यामुळे दोघांपैकी एकाला कधीना कधी एकाकीपणा हा सहन करावाच लागणार त्याला पर्याय नाही. त्यानंतर त्या गृहस्थांशी पुन्हा भेट झाली नाही कारण त्यानंतर महिन्याभरातच विजयने सोशल मीडियावर हृदय विकाराने त्यांचा  मृत्यू झाल्याची बातमी वाचली, विजयला वाईट वाटले. पण  तरीही विजय स्वतःशी पुटपुटला आता ह्यांच्या पत्नीला साथ कोण देणार ?

विजयच्या शब्दांच्या तलवारीने तसे सारेच घायाळ होत असतात पण त्याच्या समोर जास्तीच तोंड उघडणे म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेण्यासारखे असते कारण विजयला सर्वांची सर्व गुपिते माहीत असतात. पण तो स्वतःचे एकही गुपित कोणाच्या हाती लागू देत नाही. एक दिवस विजयची आई विजयला त्याच्या मित्रांच्या कमाईवरून काहीतरी बोलली. निमूट ऐकून घेईल तो विजय कसला, त्यावर तो आईला म्हणाला,” भले ते माझ्याहून खूप जास्त कमावतात पण त्यांच्या आया आजही पैशासाठी लोकांची धुणीभांडी करतात.  ती वेळ आम्ही तुझ्यावर येऊन दिली का ? नाही ना ? हेच तू तुझं चांगलं नशीब समज ! आता यावर विजयची आई काय म्हणणार ? एकदा तर रागाच्या भरात विजय असा ही म्हणाला, तुला चार पोरं आहेत पण तू तुला तीनच पोरं आहेत असं समजून जग म्हणजे तुला कोणत्याच गोष्टीच दुःख होणार नाही.

हे झालं वरवरचं पण विजयला त्याच्या आई – वडिलांचा कोणीही केलेला अपमान सहन होत नाही. तो ते बोलून दाखवत नाही पण योग्य संधी येताच त्याच्या परीने त्या अपमानाचा बदला तो घेतोच ! माफी हा शब्द विजयच्या शब्द कोषातच नाही ! इतकंच काय तो स्वतः जरी चुकला तरी स्वतःच स्वतःची शिक्षा ठरवून ती भोगतो हे जगाला माहीत नाही. विजय आता जे काही अपयशी जीवन जगतो आहे ती ही कोणाच्यातरी चुकीची तो देत असणारी शिक्षाच आहे. विजय लहान असताना काही लोकांनी विजयचा अपमान केला होता. प्रसंगी विजयने त्यांना मदतही केली पण माफ मात्र केलं नाही. चुकीला माफी नाही !  हा एका मराठी चित्रपटातील संवाद म्हणूनच विजयला खूप आवडतो. ज्याने ज्याने विजयचा अपमान केला तो एक दिवस विजयच्या टप्प्यात आलाच. पण विजय कोणाच्याही अपमानाचा बदला घ्यायला घाई करत नाही.  त्यासाठी तो कितीही वर्षे थांबायला तयार असतो , तो योग्य वेळ आणि योग्य संधीची वाट पाहतो. त्याच्या कोणत्याही शत्रूला त्याच्यावर विजय मिळविणे सहज शक्य होत नाही कारण त्याचा लग्नेश शुक्र षष्ठात  त्याच्या उच्च राशीत अर्थात मीनेत आहे.

विजय ज्या कारखान्यात काम करतो त्या मालकाने विजयला पर्याय निर्माण करण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला होता. पण त्याचा तो प्रयत्न कधीच यशस्वी झाला नाही आणि एक वेळ अशीही आली की त्याच्या कारखान्यात एकच कामगार शिल्लक राहिला तो म्हणजे विजय ! आणि त्याला आपला कारखाना चालू ठेवण्यासाठी विजयवर अवलंबून राहावे लागले. त्याला वाटत होते की विजय मूर्ख आहे म्हणून इतक्या कमी पगारात तो वेड्यासारखा माझ्या कारखान्यात एकटाच काम करून कारखाना संभाळतोय ! त्यापुढे जाऊन त्याला असेही वाटतंय की विजय दुसरीकडे काम करू शकत नाही म्हणून आपल्याकडे काम करतोय ! पण त्याच खरं कारण हे होत की विजयला उद्योग करायचा नव्हता. उद्योगानेच त्याच बालपण त्याच्याकडून हिरावून घेतलं होतं. त्याच तारुण्य हिरावून घेतलं होतं, त्याच प्रेम हिरावून घेतलं होतं, त्याचा आनंद आणि उत्साह हिरावून घेतला होता.

विजयच्या इच्छेविरुद्ध कोणताही वशीकरण मंत्रही त्याला वश करू शकत नव्हता. त्या कारखान्यात काम करणं ही त्याची इच्छा होती. त्याला आपल्यामुळे एका मराठी माणसाचा कारखाना बंद झालाच तर त्याच खापर त्याला त्याच्या माथी नको होतं म्हणून तो वाट पाहत होता त्याला पर्याय तेथे येण्याची पण तो काही येतच नव्हता. आता कदाचित तो येणारही नाही याची विजयला खात्री पटली आणि विजयला लवकरच तो कारखाना कायमाचा सोडावा लागण्याची वेळ जवळ आल्याचे स्पष्ट संकेत विजयला मिळू लागले होते.

— निलेश बामणे.

Avatar
About निलेश बामणे 420 Articles
Poet & Writer Editor - Marathi magzine Sahitya Upekshitanche
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..