विजय त्याच्या कार्यालयात बसलेला होता त्याच्या कार्यालयाच्या बाहेर दोन म्हाताऱ्या गप्पा मारत बसलेल्या होत्या. लोकांच्यात चाललेला संवाद हे विजयच्या साहित्यिक भुकेसाठी नेहमीच खाद्य ठरत असते त्यामुळे तो त्या म्हाताऱ्या स्त्रियांमध्ये चाललेला संवाद कान लावून ऐकत होता. त्यातील एक म्हातारी फक्त दुसरी म्हातारी जे काही बोलत होती ते कान देऊन ऐकण्याचे काम करीत होती. ती बडबडी म्हातारी त्या दुसऱ्या म्हातारीला सांगत होती…” मला दोन मुलगे आणि एक मुलगी आहे मोट्या मुलाला दोन मुलगे आहेत आणि मुलीला एक मुलगा एक मुलगी आहे लहान मुलाला अजून काही नाही… त्याचे दोन वर्षांपूर्वीच लग्न झाले आहे.. मी इकडे माझ्या लहान मुलीकडे राहते.. ती मला सांभाळते पण लोक मोठा मुलाला बोलतात ,” तू का नाही आईला संभाळत ! तर लोकांना सांगतो , ” तिला मुलीकडे राहायलाच आवडते , त्याची बायको फारच खचागडी आहे, तिलाही नाही वाटत आपल्या सासूची थोडी काळजी घेऊन आशीर्वाद मिळवावा, मुलगा तो तर बायकोचा बैल आहे पण माझ्या धाकट्या मुलाचा माझ्यावर खूप जीव आहे. मुलगी मला म्हणत होती ,” आई तू गावाला जाऊन रहा ! तुला खर्चाला जे काही पैसे लागतील मी पाठवत जाईन , पण गावाला जाऊन काय करणार , पुतणे आहेत पण ते येऊन म्हातारी काय करतेय ते पाहणार तरी आहेत का ? मेल्यावर येतील उचलायला ! या जगता कोणी कोणाचा नाही ! माझा धाकटा मुलगा म्हणाला , ” मको ! इकडेच राहूदे गावाला काही कमी जास्त झाल तर सारखी धावा धाव कोण करणार ? मोठ्या मुलाने लहान भावाचे लग्न करून दिले त्याला वसईला घर घेऊन दिले त्यामुळे माझ्या नवऱ्याने आमचे मुंबईतील घर मोठ्या मुलाच्या नावावर केले आणि त्याला सांगितले होते की तू आईला सांभाळ ! तो सरकारी नोकर असल्यामुळे त्याला सरकारी घर मिळाल्यावर त्याने हे घर भाड्याने दिले त्याचे १५००० रुपये भाडे येते पण त्यातील हजार रुपयेही मला द्यावेत अशी त्याची इच्छा होत नाही. आईची सेवा करून मुलांनी थोडं पुण्य मिळवायला हवं होत पण ! आता काय वय झालं ! फक्त चालत फिरत असताना जीव जावा जसा म्हाताऱ्याचा गेला इतकीच इच्छा आहे… त्यात म्हतारी हे ही सांगायला विसरली नव्हती कि तिने लोकांची धुनी भांडी करून मुलांना लहानाचे मोठे केले होते. घरात थांबायचे नाही म्हणून म्हातारी विजयच्या ऑफिसच्या बाजूला असणाऱ्या दुकाना समोरील कठड्यावर बसून येणाऱ्या जाण्याऱ्या बायकांशी गप्पा मारून स्वतःची दुःखे सांगते आणि दुसऱ्यांची दुःखे ऐकते.. उत्तम कमावते असतानाही आज मुलांकडे आपल्या म्हाताऱ्या आई वडिलांसाठी वेळ नाही.. त्याच्यासाठी वेळ काढायचा नाही, त्यांच्यावर एक पैसाही खर्च करायचा नाही, पण आयुष्यभर त्यांनी काबाड कष्ट करून कमावलेल्या संपत्तीचा मात्र त्यांना पुरेपूर उपभोग घ्यायचा असतो त्यामुळे विजय त्याच्या ओळखीच्या म्हाताऱ्या माणसांना नेहमी एकच सल्ला देतो तुमची मुले किती संस्कारी सोज्वळ असली तरी ! तुम्ही जिवंत असे पर्यत आपली संपत्ती दुसऱ्यांच्या नावावर करायची नाही. हाच सल्ला विजयने त्याच्या आई – वडिलांनाही दिला… खूप लोक रिटायर झाल्यावर आलेल्या पैशात गावाला मोठं घर बांधतात आणि गावीच स्थायिक होण्याच्या विचार करतात पण नंतर अपुऱ्या सुख साधनांना वैतागून पुन्हा शहराचा मार्ग धरतात तेव्हा त्यांच्या लक्षात येते की आपल्याजवळ असणारे सर्व पैसे खर्च करून आपण आयुष्यातील सर्वात मोठा गाढवपणा केलेला आहे … आणि त्याच टेन्शनमध्ये त्यांचे असणारे आजार बळावून बिचारे कधी कधी मृत्यूलाही जवळ करतात…आजच्या जगात मुलांना आपली संपत्ती मानण्यासारखा दुसरा गाढवपणा नाही.
सुप्रीम कोर्टाने दिलेला एक निकाळ विजयच्या वाचनात आला तो म्हणजे,” अनेक स्त्रिया आणि पुरुष लग्न न करता वर्षानुवर्षे जोडीदार म्हणून एकत्र राहतात. तथापि, एक वेळ अशी येते जेव्हा त्यांच्या नात्यात कटुता येते. त्यानंतर महिला पुरुषावर बलात्काराचा आरोप करते. अनेकवेळा लग्नाच्या बहाण्याने त्या व्यक्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोपही केला जातो. परंतु अशा प्रकरणांबाबत सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टपणे म्हणणे आहे की अशा प्रकरणात पुरुषावर बलात्काराचा गुन्हा दाखल होत नाही… हे वाचल्यावर विजयला त्याला माहित असणारी एक गोष्ट आठवली,” विजयच्या ओळखीचा एक उच्च शिक्षित चांगल्या श्रीमंत घरातील एक तरुण होता. त्याला प्रेयसीची होती. ती प्रेयसी दिसायला खूपच सुंदर आणि हुशार होती. दोघांची जोडीही एकमेकांना अनुरूप होती. एक दिवस त्याच्या वडिलांच्या बाईकचा मोठा अपघात झाला त्या अपघातात त्यांच्या पायातील हाडे मोडली म्हणून त्यांना एका हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले तेथे हा तरुण रोज त्यांची काळजी घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये थांबत असे त्यामुळे तिथे त्यांच्या सेवेला असणाऱ्या सुंदर नर्सवर तो भाळला आणि ती ही त्याच्यावर भाळली… इतर वेळी त्यांच्यात भेटी गाठी वाढल्या आणि फोन फोनी सुरु झाली या दरम्यान त्यांच्यात शारीरिक संबंधी आले.. त्यानंतर त्याचे वडील बरे होऊन घरी आले आणि त्याने तिला टाळायला सुरुवात केली कारण त्याचे काम कधीच साध्य झालेले होते… त्यामुळे त्याने तिला टाळण्याचा प्रयत्न केला… ती मुलगी खूप हुशार होती.. एक दिवस गोड बोलून तिने त्याला एक हॉटेलच्या रूमवर भेटायला बोलावले.. त्याच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि त्याला विचारले, ” तू माझ्याशी लग्न करणार की नाही ! त्याने विचार केला मी नाही ! म्हणालो तरी ही काय करणार ? तो नाही म्हणतातच ती मुलगी सरळ पोलिसचौकीत गेली आणि म्हणाली ,” त्याचे आणि माझे प्रेम संबंध होते आमच्यात शारीरिक संबंधही आलेले आहेत, त्याने मला लग्नाचे वचन दिले होते आता तो लग्नाला नाही म्हणत आहे.. पोलिसांनी तिची तक्रार नोंदवून घेतली आणि त्याला फोन करून चौकीवर बोलावले असता तो घाबरला आणि एका मूर्ख मित्राच्या सल्ल्याने तीन दिवस लपून राहिला त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर अटक वोरण्ट काढले त्यामुळे नाईलाजाने तो पोलिसात जमा झाला. त्याला मुलीच्या केसमध्ये पोलिसांनी पकडल्यामुळे त्याच्या घराची खूप बदनामी तर झालीच त्याच्या प्रेयसीनेही त्याला सोडले… शेवटी तो ही हट्टावर पेटला त्याने त्या तरुणीसोबत लग्न करायला स्पष्ट नकार दिला.. शेवटी लाखो रुपये खर्च केल्यावर त्याच्या वडिलांनी त्याची सुटका केली…या सर्व प्रकरणामुळे त्याची चांगली नोकरीही गेली होती.. क्षणिक आकर्षणामुळे त्या तरुणाने काय काय गमावले होते…. आपल्या भावनांवर संयम ठेवताच आला पाहिजे जसा विजयने ठेवलेला आहे…
— निलेश बामणे.
Leave a Reply