“मुक्काम पोस्ट १०००” या माझ्या – ‘स्वर’ प्रवासाच्या निमित्ताने माझी पत्नी सौ प्रियांका जोशी यांनी लिहिलेली ही कविता… हे तिचं मनोगतच…
चला करूया तयारी प्रवासाची
मुक्काम पोस्टला पोहोचण्याची
मुक्कामाचे ठिकाण पाहण्याची
मुक्कामाचे ठिकाण आहे दूर
कष्ट करायला लागतील भरपूर
कष्ट करत माणसांना घेत घेत
लोकसंग्रह करत करत
आईवडिलांकडून शिकत शिकत
त्यांचा सल्ला ऐकत ऐकत
जवळ आले आहे मुक्काम पोस्ट
प्रवास आहे १००० मैलांचा
गीतांच्या साथीने पार करायचा
निश्चय प्रथमच केला त्याचा
प्रवास पार करायचा
प्रवास तर पार केला
आनंद फार झाला
असाच गीत संगीताचा प्रवास
आहे तो माझ्यासाठी खास
पुस्तक तुमच्यासाठी करतो आहे सादर
नाव आहे त्याचे मुक्काम पोस्ट एक हजार
गोड मानून घ्या हे तुम्ही वाचकजन
करीतो तुम्हाला नम्र वंदन!
– सौ. प्रियांका जोशी
Leave a Reply