गेले कित्येक दिवस ब्ल्यु व्हेलची माहिती गोळा करायचा प्रयत्न करतोय, परंतु हाती ठोस असे काही लागेना. काल (१ मे २०१७ रोजी ) युरोपियन पोलीसांनी ब्ल्यु व्हेलवर अधिकृत बंदी घातली आणि सोशल मिडीयातून बरीच इन्फो लिक झाली… आणि ब्ल्यु व्हेलचा खतरनाक थरकाप समोर आला. हा तुम्हाला आत्महत्या करायला लावणारा व भाग पाडणारा एक आॅनलाईन गेम आहे. याचे मायाजाल इतके स्ट्राॅंग आहे की प्रसंगी स्वतंत्रपणे खेळणार्या दुसर्या व्यक्तीला समाविष्ट करुन आत्मघात करायला लावणारा हा खेळ खेळला जातोय. हा खेळ खेळायला उद्युक्त होणारा वयोगट आहे १२ ते ५२. हा गेम पुर्णतः आॅनलाईन असल्याने तुमच्या गॅजेटवर त्याचा पुरावा सापडत नाही. ठराविक कालावधीनंतर त्या फाईल्स डिलीटच नव्हे तर गायब होतात. ह्या गेममधे एकंदर पन्नास टास्क दिले जातात. पन्नास टास्क पार पाडताना, एक लेवल पुर्ण झाली कि हातावर एखाद्या चाकूने किंवा अणकुचिदार वस्तूने मार्क करुन घ्यायचा ज्यामुळे किंचित का होईना रक्त येईल. तुम्ही पहिल्याच टास्क आणि लेव्हल मधे इतके संमोहित किंवा हिप्नोटाईज झालेले असता कि सातत्याने त्या गेमचाच विचार करत रहाता. तुमच्या रोजच्या व्यवहारांवर मात्र कसलीच बाधा येत नाही. असे एकंदर पन्नास टास्क पुर्ण करायला हा गेम भाग पाडतो…आणि पन्नासावा टास्क आत्महत्या..! सोप्यात सोपी आत्महत्या कशी करावी याबद्दल इथे ट्रेनिंगही दिले जाते व उदाहरण म्हणून व्हीडीओ द्वारा पटवूनही दिले जाते. हातावर मनगटाच्या खाली फोरआर्मसवर केलेल्या खुणानी व्हेल माशाची आकृती तयार करायला सांगितली जाते.तुम्ही एवढे संमोहित होता कि तुम्ही त्यांच्या सुचना सहजगत्या पाळू लागता आणि नकळतपणे त्यांच्या आधीन होता. काही लेव्हल्स पार पाडताच तुमच्या घरी जी व्यक्ती ब्ल्यु व्हेल खेळंत असेल त्याच्या आवडीच्या वस्तु येउ लागतात. मुख्य म्हणजे खेळणार्या व्यक्तीच्या त्या रोजच्या वापरातल्या वस्तु असल्याने त्याबद्दल पालकांना आणि मित्रानाही पुसटशी शंका देखिल येत नाही. खेळणार्या व्यक्तीच्या अकाउंटला पैसे जमा होत रहातात. त्रयस्थ व्यक्तीला हे पैसे टास्क पूर्ण केल्याबद्दलचे आहेत हे कळल्यावर विश्वास बसेल असा हा गेम आहे. या गेमची रचना इतकी जबरदस्त आहे कि सर्वसामान्य लोक, त्या व्यक्तीचे मित्र व नातेवाइक कुठलाही विरोध न करता त्याला प्रोत्साहित करत रहातात…आणि अशा रितीने ब्ल्यु व्हेल गेम खेळणारी व्यक्ती ५० टास्क नंतर आत्महत्या करते, ज्याचे कारण फक्त आणि फक्त गेमला आणि त्या व्यक्तीलाच माहित असते. रशियात गेल्या काही महिन्यातच १५० च्या आसपास आत्महत्या घडून आल्यात. वयोगट आहे १२ ते ५२. आता हे लोण युरोपमार्गे भारतात येतंय. भारतात नेटच्या आहारी जाण्याचे प्रमाण भयंकर आहे. तरुण मुलांमधे तर खुपच..! यावर विनंती एकच कि मुलांच्या सर्फिंगबाबत प्रचंड सतर्क रहाण्याची वेळ येउन ठेपलीय. अर्थात यावर रेमिडी ही ज्याची त्यानेच शोधायचीय..!
— भाकु
Leave a Reply