नवीन लेखन...

एक तर्क

श्रीदत्तमहाराजांचे सद्भक्त पुन्हा पुन्हा जन्म घेऊन श्रीदत्तमहाराजांचे कार्य करत आपली आत्मिक उनती साधतात. किंबहुना श्रीदत्तमहाराजाच आपल्या सद्भक्तांना पुर्नजन्म देऊन त्यांच्याकडून इप्सित कार्य करवून घेतात. गेल्या १००० वर्षांतील दत्तभक्तीचा आणि दत्तभक्तांच्या आयुष्याचा वेध घेतला असता याबद्दल प्रचिती येते.

दामाजीपंतांनी दुष्काळात अन्नधान्याचे कोठार सर्वसामान्य जनतेसाठी खुले केले होते आणि तशीच घटना साताऱ्याचे देव मामलेदार यांच्या आयुष्यातही घडली. नावे आणि कालखंड वेगवेगळा असला तरी हे दानशूरतेचे कार्य करणारा आत्मा एकच असवा.

दत्तभक्त सायंदेव हे श्रीनृसिंहसरस्वती महाराजांचे समकालीन सिद्ध नामधारक यांच्यातील संवादरूपाने लिहिला गेलेला “श्रीगुरुचरित्र” हा ग्रंथ सायंदेवाच्या वंशातील श्रीसरस्वती गंगाधर यांनी लिहिला. हे आपण सर्वांसच विदितच आहे. सायंदेवाने गाणगापूरला श्रीनृसिहसरस्वती महाराजांच्या दर्शनासाठी येताना “दंडवत” घालत आगमन केले होते असा श्रीगुरुचरित्रात उल्लेख आहे. गुरुजींचे सद्गुरु पूज्य श्रीदंडवते महाराज यांनीही अशाच प्रकारे दंडवत घालत भारतभ्रमण केले आपल्या हयातीत दंडवतमहाराजांनी श्रीगुरू चरित्राच्या जन्मस्थळाचाही शोध घेत घेत कडगंची येथील सायंदेवाच्या वंशावळीपर्यंत मार्ग काढला होता.

वर्तमानात घडलेली आयुष्यातील एखादी वैशिष्ट्यपूर्ण घटना, प्रवृत्ती, लकब ही काळाच्या ओघात कित्येक वर्षांपूर्वी घडलेल्या एखाद्या प्रसंगाची, प्रवृत्तीची, लकबीची पुनरावृत्ती असल्यास लौकिकार्थाने त्या व्यक्ती जरी भिन्न असल्या तरी तो आत्मा एकच आहे असे समजून त्या व्यक्तीच्या जन्माची आपण सांगड घाल शकतो. सांप्रत दत्तभक्त सायंदेव हेच श्रीदंडवते महाराजांच्या रूपाने पुर्जनन्म घेऊन त्यांनी “दंडवत घालत” तीर्थाटन आणि दत्तभक्तीचा प्रसार केला असे वाटते.

श्रीगुरुचरित्रातील ३० ते ३२ या अध्यायातून माहूर येथील दत्तभक्त सतीला गाणगापूरक्षेत्री तिचा दिवंगत पती पुन्हा जिवंत श्रीनृसिंह सरस्वती महाराजांनी सौभाग्यदान दिल्याची घटना वर्णिली आहे. गाणगापूर येथील “सतीचा कट्टा” आजही या घटनेची साक्ष देतो. ती सती पतीसह गाणगापूरला न राहता आपल्या पतीसह माहूर मुक्कामी परत गेली. आपले गुरुजी दत्तकृपेने जन्मलेले नवस फेडण्यासाठी बालवयात गुरुजींच्या पायात चांदीची बेडी होती. माईंचे आयुष्य गुरजींनी श्रीदत्त महाराजांकडे प्रार्थना करून ३० वर्षांनी वाढवून घेतले ही घटना. गुरुचरित्रातील माहूरच्या जोडप्याची मनात आठवण करून देते. माहूरच्या या जोडप्याला गाणगापूरक्षेत्री श्रीदत्तहाराजांच्याजवळ आपले वास्तव्य असावे अशी मनी प्रबळ इच्छा असावी. श्रीदत्त गुरूंनी गाणगापूर येथे सतीच्या कट्ट्याजवळ च आश्रमासाठी जागा मिळवून देऊन गुरुजींना हे श्रीसान्निध्य दिले! गुरुजी आणि माई यांचे आत्मीय संबंध पाहता हेच ते माहूरचे जोडपे पुनर्जन्म घेऊन पुन्हा अवतरले आहे हा विचार मनात आल्यावचून राहत नाही.

या जन्मीच्या गुरुजींच्या पुण्याईला गेल्या जन्मातील दत्तभक्तीची जोड आहे. अन्यथा सामान्यांना उभ्या आयुष्यात ऐखादे दिवसही गाणगापूरक्षेत्री वास्तव्य करणे कठीण.

-– श्री. उन्मेष म. पाटील, विलेपार्ले (पूर्व)

साभार – गुरुतत्व मासिक, वर्ष ३ रे, अंक ५ वा, (अंक २९)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..