नवीन लेखन...

एक उनाड दिवस – भाग १

अमित त्यादिवशी दमून आला ऑफीसमधून. सायली लवकर अली होती नेहमीपेक्षा. अमित दार उघडून आत आला तर पर्स, गाडीची किल्ली, स्टोल सगळं सोफ्यावर पसरलेलं सायली मस्त गॅलरी मध्ये उभीराहून मैत्रिणीशी फोन वर बोलत होती. त्या सगळ्या पसाऱ्याकडे एक नजर टाकून अमितने मान हालवली आणि आपल्या सगळ्या वस्तू जागच्या जागी ठेवल्या. टाय सैल करत, हाताच्या बाह्या दुमडत पाठमोऱ्या सायलीला हळूच जाऊन बिलगला. सायलीने पण मैत्रिणीला कटवलं, तशीच त्याची मिठी सैल करत वळली. म्हणाली “काय रे! आज पण उशीर?
मग उद्या सुट्टी, काय प्लॅन आहे?”
अमित म्हणाला “काही नाही. आराम एक्के आराम.”
फ्रेश होऊन मस्त दोघांनी कॉफी घेतली. जेवण आटोपलं आणि दुसऱ्यादिवशी सुट्टी असल्यामुळे पुन्हा दोघे निवांत गॅलरी मध्ये गप्पा मारत बसले. वेळ कसा गेला कळलंच नाही. एरवी ऑफिसची तयारी, घाई-गडबड यामुळं निवांत वेळ यायचाच नाही दोघांच्या वाट्याला. त्यात सतत येणारे कामाचे फोन त्यामुळे दोघांनीही फोन बाजूला ठेऊन मस्त वेळ घालवला. झोपताना मात्र काही महत्वाचा इमेल किंवा मेसेज आहे का हे पाहण्यासाठी सायली ने फोन पहिला आणि किंचाळली जोरात “आई शप्पत ”
“अगं काय झालं ?” अमित धावतच तिच्याजवळ आला. “अरे आपला कॉलेज गृप; उद्या सत्याच्या फार्म हाऊस वर जाऊन पार्टी करणार आहेत सगळे. एक आख्खा दिवस कसलं भारी ना! ए जाऊया ना चाल ….” सायली उत्साहाने म्हणाली.
“अगं वाजलेत बघ किती ? एक वाजत आलाय ” अमित.
“आता त्याचा काय संबंध इथे?? उद्या निघायचं आहे सकाळी ६ ला. मीच फोन उशिरा पहिला. कधीचाच मेसेज आलाय.” सायली.
अगं काही प्लॅनिंग नाही , बॅग भरली नाही,काही तयारी नाही कॅमेरा ,पॉवरबँक आणि … ”
त्याला तोडतच सायली म्हणाली ” अरे वने डे पिकनिक आहे. सकाळी जाऊन यायचं आहे संध्याकाळी त्यात काय प्लॅनिंग…चल न प्लिज ? हवं तर मी उठून सकाळी आवरते सगळं ?”
“बरं जाऊया आपण.” अमित तसा तयार नव्हता पण हो म्हणाला तिला. बाहेर फिरायला जाऊनही खूप दिवस झाले होते दोघांना.
सायलीचा हट्ट आणि तिला नाही म्हणायचं हे अमितला कधीच जमलं नव्हतं फ्रेशर्स पार्टीत पहिली भेट झाल्यापासून अगदी आज पर्यंत.

अमित आणि सायली कॉलेजमधलं सगळ्यात वेगळं कपल , एकमेकांना पूरक; अगदी त्या जिगसॉ पझल सारखं. अमित म्हणजे फुल प्रूफ प्लॅन , सायली एकदम बेधुंद . अमित म्हणजे कागदावरच वेळापत्रक आणि सायली म्हणजे हातावरचा पावसाचा थेम्ब अगदी बेभरवशाचा . अमित म्हणजे नीटनेटके पण आणि सायली म्हणजे पसारा,. पण या सगळ्यात कधी तो,कधी ती सावरत सांभाळत आले एकमेकाना. आहेत तसे एकमेकांना स्वीकारुन आज छान जगत होते. संसाराचं वय वर्ष दोन, अगदीच अल्लड, पण मस्त एन्जॉय करत होते दोघे.

सकाळचे पावणे सहा वाजले तरी सायली बाई अजून अंथरुणातच होत्या. अमित मात्र सकाळी पाचलाच उठून काय हवं नको पाहून सगळी बॅग आवरुन तयार होता. त्याने हलकेच झोपलेल्या सायलीच्या गालावर आलेले केस मागे केले आणि हळूच आपले ओठ तिच्या गालावर ठेवले .

“गुड मॉर्निंग” सायली झोपेतच म्हणाली.

” जायचं आहे की मेसज करू कॅन्सल आहे म्हणून” अमित म्हणाला, तशी ताडकन उठली सायली.
घड्याळ पाहिलं तर सहा वाजत आहे होते म्हणाली .” का नाही उठवलंस रे मला”
“अगं किती हाका मारल्या पण तुझी स्वप्न संपतील तर ना ”
सायलीचं आवरे पर्येंत अमितने सगळं सामान गाडीत नेऊन ठेवलं , आणि सत्याने ,त्याच्या मित्राने पाठवलेलं लोकेशन मॅप वर पाहू लागला . आणि त्याने ते सेव पण केलं फोन मध्ये.

गाडीत बसायच्या आधी सायली किमान तीन वेळा तरी दारातून घरात विसरलेल्या गोष्टी आणायला फेऱ्या मारून अली. तिची ती झोळी वजा बॅग तिने घेतली. अमित त्याला अलिबाबा ची गुहा म्हणायचा. कधी काय निघेल त्यातून सायलीलाच ठाऊक.
शेवटी सुटली यांची गाडी तेंव्हा जवळ जवळ सात वाजत आले होते. बाकीचे सगळे सहा सव्वासहाला निघाले होते. गाडीत बसून सायली ने सगळ्यांना फोन केले.सेल्फी काढली, पाठवली सुद्धा. उरला सुरला मेकअप तिने गाडीतच केला.

ऑरेंज कलरचा छान ए लाईन फुल स्कर्ट, त्यावर व्हाईट कलरचा आणि ऑरेंज पायपिंग असलेला बेल स्लीव्ह चा टॉप त्यावर पीच ऑरेंज कलरचा स्टोल , त्याला सूट होतील अशी हलके लोंबणारे कानातले अश्या घाई मधे सुद्धा सायली सुंदर तयार झालेली. अमितही नेहमी प्रमाणे थ्री फोर्थ सिक्स पॉकेट पॅन्ट आणि आणि नेव्ही ब्लु शर्ट मध्ये कंफ़र्टबल गाडी चालवत होता.

शहर सोडल्यावर मस्त हिरव्या कमानी त्यांच स्वागत करत होत्या. त्यातून येणारे कवडसे काचांवर लपंडाव मांडत होते. शहरापासून फार्महाउस ४ तासांच्या अंतरावर होते. नाश्त्याच्या वेळेपरेंत तिथे पोहचायचं होत. जेमतेम दीड एक तास झाला असेल. आजूबाजूची शेतं अजूनच गडद होत चाललेली. माणसाची वाहनांची तुरळकच वर्दळ होती. सायलीच्या आवडीचं गाणं लागलं होत. डोळे मिटून शांत गाणं ऐकत असतानाच एक जोराचा कर्कश्य आवाज आला आणि गाडी आहे तिथे थांबली… …

क्रमशः

— मधुरा कुलकर्णी
मधुरंग

Avatar
About `आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप 374 Articles
आम्ही साहित्यिक या फेसग्रुप ग्रुपवरुन आलेले लिखाण. हा ग्रुप मराठीसृष्टीने बनवला आहे व त्यावरील निवडक साहित्य मराठीसृष्टीवर प्रकाशित केले जाते. मराठीतील हा एक लोकप्रिय आणि दर्जेदार साहित्यविषयक ग्रुप आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..