युती तुटली, युती फुटली,
आघाडीमध्ये झाली बिघाडी,
बाण सुटला, त्राण खुंटला,
कमळाच्या पाकळ्या, झाल्या मोकळ्या…………
घडाळ्याचे काटे, झाले सुटे,
हाताच्या पंजाचा, वार जोराचा,
सरकार पडले, सरकार गडगडले,
आता पाहू जोर कोणाचा?
मित्र पक्षांची, झाली कोंडी,
कोण कोणाची, सावरेल उतरंडी,
एकच प्यारा, एकच नारा,
“हीच ती वेळ, हाच तो क्षण”
एकत्र येतील का दोघेजण?
एकत्र येतील का दोघेजण?
Leave a Reply