एकदा तुझी अन
माझी भेट व्हावी
हात हातात तू घेता
कातरवेळ तुझ्यात फुलावी..
एकदा तुझी अन
माझी भेट व्हावी
तुझ्या मोहक मिठीत
मी अलवार मोहरुन जावी..
एकदा तुझी अन
माझी भेट व्हावी
व्याकुळ वेळ क्षणांची
आस तुझ्यात मिटावी..
एकदा तुझी अन
माझी भेट व्हावी
प्रतीक्षा तुझी आतुर मनी
तुझ्या मिठीत मी लाजवी..
एकदा तुझी अन
माझी भेट व्हावी
वाट तुझी पाहते कातर क्षणी
ती वाट तुझ्यात मुग्ध मोहरावी..
एकदा तुझी अन
माझी भेट व्हावी
निःशब्द भावनांची व्यथा
दोघांच्या हृदहस्थ रहावी..
एकदा तुझी अन
माझी भेट व्हावी
तुझ्यात हलकेच मी
गंधाळून रोमांचित व्हावी..
एकदा तुझी अन
माझी भेट व्हावी
साद तुला घातली आल्हाद
तुझ्यात आस अबोध उरली..
एकदा तुझी अन
माझी भेट व्हावी
भिजशील तू आरक्त देही अलगद
काव्यासोबत तेव्हा सांज केशरावी..
एकदा तुझी अन
माझी भेट व्हावी
अवखळ वेल्हाळ क्षण सारे
अल्लड माझ्यासवे तू ही अवखळ होशी..
एकदा तुझी अन
माझी भेट व्हावी
भिजल्या सांज केशरात त्या
आठवणींची दोघांत ओल उमलावी..
— स्वाती ठोंबरे.
Leave a Reply