नवीन लेखन...

एखादे पद मलाही द्या हो!

माणसाची ओळख आता माणूस म्हणून उरलेली नाही,तो कुठल्या तरी पदावर असला तरच त्यास प्रतिष्ठा आहे. हजारों प्रकारची बिरुदे प्रतिष्ठेची बनली आहेत. कोणते तरी बिरुद असल्याशिवाय आपणास कुणी ओळखते की नाही,अशी शंका आता येऊ लागली आहे.

एकदा हे बिरुद अथवा पद माणसाला चिकटले की काही केल्या ते जात नाही, मेल्यावर देखील माजी हे बिरुद लागून ते मिरविले जाते.
एखादी सरकारी नोकरी, राजकीय पदे, संघटना, आध्यात्मिक बिरुदे, विविध मंडळे यांचे माजलेले स्तोम पदाचा महिमा सांगते. अनेकांच्या दारावर तशा पाट्याही असतात.लग्नपत्रिकेवर या पदांचा उल्लेख केला जातो. सत्कार समारंभात तर या पदाधिकाऱ्यांचा भरना असतो.

तुमच्याकडे पद नसेल तर तुम्ही काय कामाचे,असेच जसे समजले जाते.

पदाची एक पत आहे. विरोधी पक्ष देखील प्रति मंत्री मंडळ तयार करतो. वर्गाचा प्रमुख देखील थोडीशी छाती काढल्याशिवाय राहत नाही. पदाचा महिमा अपार आहे.

आ.खा. म्हणजे आमदार, खासदार लिहावेच लागते. मा.आ. लिहिले की माननीय आणि माजी असे दोन अर्थ निघतात, जे सोयीचे असतात.
किमान गल्लीतल्या गणेश मंडळाचे सरचिटणीस पद जरी आपणास लाभले तर भले होईल. अनेक समित्या या पदाची हौस भागविण्यासाठी निर्माण झालेल्या असतात. मागणी खुप असल्याने येणाऱ्या काळात नवनवीन पदे निर्माण होतील.

आफिसातले ‘साहेब’ घरी आल्यावर सुध्दा साहेबच असतात, इतक्या या पदांचा सोस असतो. शाळेचा शिक्षक जिथे तिथे ‘सर’ असतो. नको तिथे देखील!

अनेक बिरुदे संक्षिप्त लिहिली जातात. जशे न्या.डा.पो.नि., प्रा. वगैरे.

संचालक, सदस्य यांचा तर सुकाळ असतो. त्यामध्ये ‘माजी’ मिसळले की दुधात पाणी टाकल्यासारखे वाटते.

कोणते तरी पद असले की एखादा हार गळ्यात पडतोच.

पदव्या पदच आहेत, म्हणून तर डा. हे बिरुद लावूनच नाव लिहिले जाते. नाव ठेवलेले असते, पदाचे नाव कमावलेले असते.

अनेक राजकीय पक्षांची अनेक पदे असतात. राष्ट्रीय कार्यकारिणी पासून तर दहीहंडी समितीचा सदस्यांपर्यत या पदानी मजल मारलेली असते.
सेवक, हवालदार, कारकून, होमगार्ड, कंडक्टर अशी कितीतरी पदे आहेत की प्रतिष्ठेची नसली तरी असल्याचा आनंद कमी नसतो. अध्यक्ष हे पद मात्र आपली प्रतिष्ठा राखून आहे. मग एखाद्या साखर कारखान्याचा अध्यक्ष असो की शालेय समितीचा, पहिला मान त्याचा असतो.

‘विभागीय’ या पदांचा रुबाब वेगळा आहे. विभागात आपण सर्वोच्च आहोत ही बाब सुखावून जाते. इतरांना तुच्छ समजणे त्यासाठी आवश्यक असते. जसे नवीन लेखकांना जूने लेखक पाय रोवू देत नाहीत. बसमध्ये सीटवर जागा असून देखील जागा न देणाऱ्या प्रवाशांसारखी त्यांची गती असते.

पदामध्ये अधिकारी शब्द आला की ‘माज’ हा देखील येतो. मला कसेही वागण्याचा अधिकार आहे,असे तो समजू लागतो.

काही अस्थायी पदे आजन्म साथ सोडत नाहीत. साथीच्या रोगासारखे ते पसरतात. आध्यात्मिक क्षेत्र ह्यास अपवाद नाही. स्वामी, मठाधिपती, महाराज, संत वगैरे बिरुदे असतात.

महानायक, परमपूज्य तर असतेच. धर्मयोगी, कर्मयोगी, महर्षी, योगी अशा अनेक पदव्या बहाल करण्यात येतात. भाग्यविधाते, जहांगीर, आलमगीर,नवाब हे होतेच.

सुरुवातीला ओळख म्हणून वापरले जाणारे पद प्रतिष्ठेची बनली. पदाचा हा विळखा थोडा सैल झाला पाहिजे. पदाशिवाय आपण कोण आहोत ह्याचाही विचार केला जावा, एवढ्यासाठी हा खटाटोप.

— ना. रा. खराद.

अंबड

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..