नवीन लेखन...

इलेक्ट्रिक जनरेटर

भारनियमनाच्या काळात कुठलेही कार्यालय किंवा खादे गृहसंकुलही वीज खंडित झाल्यानंतरही प्रकाशित राहू शकते, ते इलेक्ट्रिक जनरेटरमुळे इलेक्ट्रिक जनरेटरचा आता तर आवाजही येत नाही त्यामुळे त्याला सायलंट पॉवर असेही म्हटले जाते. लेक्ट्रिक जनरेटरमध्ये यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर हे विद्युत ऊर्जेत केले जाते. १८३१ मध्ये ब्रिटनमध्ये मायकेल फॅरेडे या शास्त्रज्ञाने अशा प्रकारचा पहिला नरेटर तयार केला होता. जेव्हा एखादे रेचे वेटोळे चुंबकाच्या प्रभाव क्षेत्रात फिरते तेव्हा विद्युतप्रवाहाची निर्मिती होते असे फॅरेडेने त्यावेळी शोधून काढले. जेव्हा चुंबक या तारेच्या वेटोळ्याजवळ आणला जातो तेव्हा तिच्यातून विद्युतप्रवाह वाहतो. जर चुंबक ओढला तर हाच विद्युतप्रवाह विरुद्ध दिशेने वाहतो.

त्यानंतर फॅरेडेचे तत्त्व वापरून फ्रान्सच्या हिपोलाईट पिक्सी याने स्थिर वायरच्या वेटोळ्याभोवती चुंबक फिरता ठेवून अधिक सक्षम असा जनरेटर तयार केला. त्याने इलेक्ट्रोमॅग्रेटिक इंडक्शनचे तंत्र वापरले ते. त्यानंतरच्या काळात वेर्नर व्हॉन सिमेन्स, झेनोब थिओफिले ग्रॅमी व थॉमस एडिसन यांनी त्यात अनेक सुधारणा केल्या. असे असले तरी वीजनिर्मितीसाठी त्याचा वापर हा १८८० नंतर सुरू झाला. पिक्सीच्या सुरुवातीच्या यंत्रात तारेची वेटोळी घोड्याच्या नालेच्या आकाराच्या चुंबकासमोर येतील अशा रितीने ठेवले जातात व यात चुंबक दोन कॉईल्सच्या खाली असल्याने सतत दिशा बदलणारा विद्युतप्रवाह म्हणजे अल्टरनेटिंग करंट तयार होतो.

सिमेन्स जनरेटर हा १८५६ मध्ये जर्मन संशोधक वेर्नर व्हॉन सिमेन्स यांनी तयार केला. त्यात बॉबिनच्या आकाराची कॉईल वापरून आर्मेटर (विद्युतनिर्मिती करणारा भाग) तयार करण्यात आला होता. १८८१ मध्ये त्याचा वापर रेल्वे चालवण्यासाठी करण्यात आला.

स्थायी चुंबकाच्या ऐवजी इलेक्ट्रोमॅग्रेट वापरून सिमेन्स यांनी पहिला जनरेटर तयार केला. या जनरेटरमध्ये तारेची वेटोळी जास्त तापत होती. हा एक मोठा दोष होता. तो दूर करण्यासाठी या वेटोळ्यांचा म्हणजे कॉईल्सचा आकार बदलण्याचे काम फ्रान्सचे झेनोब थिओफिले ग्रॅमी यांनी केले व जनरेटर वाफेच्या इंजिनावर चालवला. १८७३ मध्ये व्हिएन्ना येथील एका प्रदर्शनात ग्रॅमी यांचा जनरेटर ठेवण्यात आला होता, त्यावेळी आजूबाजूच्या जनरेटरकडून त्याने करंट ओढला व मोटरसारखा फिरू लागला त्यावेळी अपघातातून इलेक्ट्रिक मोटरची संकल्पनाही समजली. डिझेल पॉवर जनरेटरमध्ये दोन भाग असतात एक म्हणजे डिझेल इंजिन व दुसरा म्हणजे इलेक्ट्रोमॅग्रेटिक जनरेटर, ते क्रॅकशाफ्टने जोडलले असतात. डिझेल इंजिन हे जनरेटरमध्ये गती निर्माण करते व नंतर इलेक्ट्रोमॅग्रेटचा वापर करून वीज निर्मिती केली जाते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..