नवीन लेखन...

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र

Electronic Voting Machines

निवडणूक आयोगाने काही वर्षांपासून इलेक्ट्रोनिक मतदान यंत्रांचा वापर करुन मतदान घ्यायला सुरुवात केली आहे. या यंत्रांबद्दलची काही प्रश्नोत्तरे…


इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रणा काय आहे ?

पूर्वी पारंपारिक मतदान पध्दतीत वापरल्या जाणाऱ्या मतपत्रिका आणि मतपेट्यांच्या जागी आलेले एक साधे इलेक्ट्रॉनिक उपकरण म्हणजे हे मतदान यंत्र होय.

पारंपारिक मतपत्रिका/मतपेट्या पद्धतीपेक्षा ईव्हीएम चे फायदे काय आहेत ?
अ) अवैध आणि शंकास्पद मते टाळता येतात. बऱ्याच प्रकरणात अशी मते वाद आणि निवडणूक याचिकांना कारणीभूत ठरतात. ब) पारंपरिक पध्दतीपेक्षा या यंत्रामुळे मतमोजणी प्रक्रिया अधिक जलद होते. क) या पध्दतीमुळे कागदांचा वापर मोठया प्रमावर कमी झाल्यामुळे वृक्ष संवर्धन होत आहे त्यामुळे ही प्रक्रिया पर्यावरण अनुकूल होत आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर एकच मतपत्रिका आवश्यक असल्यामुळे ड) छपाईचा खर्च जवळजवळ शून्य झाला आहे.

भारताव्यतिरिक्त इतर कोणते देश निवडणूकीत ईव्हीएम वापरतात?
गेल्या निवडणुकीत भूतानने संपूर्ण देशात भारतीय ईव्हीएम वापरले होते. नेपाळनेही त्यांच्या गेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये काही मतदारसंघात ही यंत्रे वापरली होती.

भारतात ईव्हीएम वापरण्यास केव्हा सुरुवात झाली ?
1982 मध्ये केरळमधील परुर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी 50 मतदान केंद्रांवर प्रथमच ईव्हीएम वापरण्यात आले.

भारतीय ईव्हीएमची वैशिष्टये कोणती?
हे एक साधे आणि सरळ यंत्र असून निवडणूक कर्मचारी आणि मतदार अगदी सहज ते वापरू शकतात. तसेच हे यंत्र मजबूत असल्यामुळे हाताळण्यासाठी सोपे असते आणि कुठल्याही वातावरणात ते वापरता येऊ शकते. कुठल्याही नेटवर्कशी जोडणी नसणारे हे एकमेव यंत्र आहे, त्यामुळे याच्या कार्यान्वयनात तसेच कुणीही ढवळाढवळ करू शकत नाही तसेच निकालातही कुणी बदल करू शकत नाही. देशातील बऱ्याच ठिकाणच्या अनियमित वीजपुरवठयामुळे या यंत्रात बॅटरीवर चालण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

निवडणुकीत मतपत्रिकांऐवजी ईव्हीएम व्यवस्था आणण्याची गरज का पडली?
निवडणुकीत मतपत्रिाकांची मोजणी करण्यासाठी लागणारा प्रदीर्घ काळ, उमेदवार/राजकीय पक्षांसह मतमोजणी करणाऱ्या अधिकाऱ्यांसाठीही कठीण असे. तसेच कधीकधी दोन दिग्गज उमेदवारांच्या मतांमध्ये कमी फरक आढळल्यास फेर मतमोजणी करण्याच्या मागणीमुळे ही परिस्थिती आणखी कठीण होत असे.

भारतात ईव्हीएमची निर्मिती कोणी केली?
केंद्र सरकारच्या भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडकडूनच या यंत्राची निर्मिती केली जाते आणि त्यांच्याकडून हे यंत्र भारतीय निवडणूक आयोग घेत असे.

ईव्हीएमला मान्यता देण्यापूर्वी निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांशी सल्लामसलत केली होती का ?
होय, सर्व मान्यता प्राप्त राजकीय पक्षांबरोबर ह्या प्रकरणाची चर्चा करण्यात आली होती. तसेच त्यांना याचे प्रात्यक्षिकही दाखवण्यात आले होते.

ईव्हीएमला मान्यता देण्यापूर्वी ईसीआयने तांत्रिक तज्ज्ञांचा सल्ला घेतला होता का ?
होय, ईव्हीएम सुरू करण्यापूर्वी प्रा. एस. संपथ, प्रा. पी.व्ही. इंदिरेसर आणि डॉ. सी. राव कसारबडा यांच्या तांत्रिक समितीचा सल्ला घेण्यात आला होता. या समितीने या यंत्राच्या सर्व तांत्रिक बाजू सूक्ष्मपणे तपासल्या आणि एकमताने निवडणुकीत हे यंत्र वापरण्याची शिफारस केली.

नियंत्रण कक्षाची वैशिष्ट्ये काय आहेत?
नियंत्रण कक्ष हा एक मुख्य विभाग असून सर्व माहिती साठवण्याचे आणि ईव्हीएमच्या कार्यान्वयनावर नियंत्रण ठेवण्याचे कार्य ते करते. नियंत्रण कक्षाच्या कार्याचे नियंत्रण करणाऱ्या कार्यक्रमाचे रुपांतर मायक्रोचीपमध्ये केले जाते. हे रुपांतर केल्यामुळे ते वाचता येत नाही, त्याची नक्कल काढता येत नाही तसेच त्यात बदलही करता येत नाहीत. मतदान कक्षातून नियंत्रण कक्षाकडे पाठवण्यात आलेली माहिती सुरक्षित राहण्यासाठी कोडिंग पध्दतीचा वापर केला जातो. नवीन मतदान यंत्रांमध्ये घडयाळ आणि तारीख नोंद करण्याची सुविधा असल्यामुळे मतदानाची वेळ आणि तारखेची नोंद करणे सोपे जाते. मतदान पूर्ण झाल्यानंतर close बटण दाबले जाते, यानंतर यंत्र कुठलीही माहिती स्वीकारत नाही किंवा कुठलेही मत नोंदवता येत नाही. Total बटण दाबल्यानंतर नियंत्रण कक्ष त्यावेळेपर्यंत नोंदवलेल्या मतांचा आकडा दाखवते, ही आकडेवारी 17-ए या मतदार नोंदणीतील अर्जाशी पडताळून पाहिली जाते. नियंत्रण कक्षाच्या डिस्प्ले सिस्टिमकडून मतदान केंद्रातील एकूण मतदान दाखवले जाते. आणि result बटण दाबवल्यावर उमेदवारनिहाय मत दर्शवली जातात. मतमोजणी केंद्रांवर, मजमोजणी अधिकाऱ्याच्या उपस्थितीत मतमोजणी कर्मचारी result बटण दाबतो. कनेक्टींग केबलशी केलेल्या अनाधिकृत गोष्टीही नियंत्रण कक्ष शोधून काढतो आणि डिस्पले युनिटमध्ये ते दाखवतो.

विद्युतपुरवठा नसलेल्या भागात ईव्हीएम कसे वापरले जाते?
ईव्हीएम विद्युतपुरवठयावर अवलंबून नसते. ते अल्कलाईन बॅटरीवर चालते.

ईव्हीएममध्ये जास्तीत जास्त किती मते नोंदली जाऊ शकतात?
ईव्हीएममध्ये कमाल 3840 मते नोंदली जाऊ शकतात. एका मतदान केंद्रावर सामान्यपणे 1400 हून कमी मतदारांची संख्या असते.

काही निवडणुकीत मोठया प्रमाणावर उमेदवार निवडणूक लढवतात. ईव्हीएममध्ये जास्तीत जास्त किती उमेदवार सामावू शकतात ?
उमेदवारांची संख्या 64 पर्यंत असल्यास ईव्हीएम द्वारे निवडणूका घेता येतात.

उमेदवारांची संख्या 64 हून अधिक झाल्यास काय होते ?
अशा प्रकरणात पारंपारिक मतपत्रिका/मतपेटयांच्या पारंपारिक पध्दतीनुसार निवडणुका घेतल्या जातात.

अशिक्षित मतदाराला मतदान केंद्रावर ईव्हीएम वापरणे कसे समजू शकते? यासाठी त्याला कोण मदत करेल ?
मतदान अधिकाऱ्याकडे मतदानासंदर्भातील पुठ्ठाची प्रतिकृति उपलब्ध असते. याद्वारे हा अधिकारी तुम्हाला ईव्हीएमद्वारे कसे मतदान करायचे, त्याचे प्रात्यक्षिक दाखवतो. तथापि ज्या ठिकाणी खरे मतदान यंत्र असते त्या मतदान कक्षात प्रवेश करण्याची परवानगी त्याला नसते.

ईव्हीएममध्ये कुणी अनधिकृत बदल करु शकतो का ?
ईव्हीएममध्ये कुठलेही अनधिकृत बदल करता येणार नाही अशी व्यवस्था बनवण्यासाठी पुरेपूर काळजी घेतली जाते. ईव्हीएममध्ये वापरण्यात आलेल्या मायक्रो प्रोसेसर चिपच्या प्रोगामिंगचे रुपांतर चिपमध्ये केले जाते. यात बदल करता येत नाही अथवा त्याची नक्कलही करता येत नाही. खबरदारीचा अतिरिक्त उपाय म्हणून मतदानासाठी बनवलेली यंत्र उमेदवार किंवा उमेदवाराच्या प्रतिनिधीच्या उपस्थितीत सीलबंद केली जातात आणि केंद्रीय पोलिस दलाच्या निगराणीखाली सुरक्षित ठिकाणी ठेवली जातात. उमेदवाराचे प्रतिनिधी सुध्दा या ठिकाणी पहारा ठेवतात. निवडणूकीपूर्वी आणि निवडणूकीनंतर ही यंत्रे ठेवण्याच्या जागी प्रवेश करण्यासाठी कडक प्रक्रियेतून जावे लागते. निवडणूक आयोगाने या कार्यात पारदर्शकता आणण्यासाठी ही पध्दती तयार केली आहे.

कोणत्याही एका पक्षाची/उमेदवाराची बाजू घेण्यासाठी ईव्हीएममध्ये निवडणूकीच्या आधी काही बदल करता येतात का ?
एका विशिष्ट उमेदवाराच्या नावावर मते हस्तांतरित करण्यासाठी त्या उमेदवाराचा अनुक्रमांक प्रोगामला ओळखता यायला हवा. मतदान पत्रावरील उमेदवारांची सूची ज्या क्रमांकाने उमेदवारांची नामांकनपत्रे आली आणि वैध ठरवली गेली त्यानुसार असते. त्यामुळे त्याचा आधी अंदाज बांधता येत नाही.

पारदर्शकतेची खात्री देण्यासाठी आणि ईव्हीएमचा गैरवापर होत नसल्याचे सिद्ध करण्यासाठी ईसीआयकडून कोणती कार्यप्रणाली अनुसरण्यात आली आहे ?
या यंत्रांच्या सुरक्षितततेसाठी आयोगाकडून विविध पातळयांवर कडक कार्यप्रणाली तयार करण्यात आली आहे. आयोगाने दाखवून दिलेल्या तत्त्वांनुसार दोन सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांकडून ही यंत्रे तयार करण्यात आली आहे. त्यासाठी आयोगाने तांत्रिक तज्ज्ञांच्या समितीशी सल्लामसलतही केली आहे. प्रत्येक निवडणूकीच्या पूर्वी या दोन कंपन्यांच्या अभियंत्यांकडून ही यंत्रे तपासली जातात. सामान्यत: ही यंत्रे जिल्हा मुख्यालयात जिथे प्रवेश निषिद्ध असतो अशा ठिकाणी ठेवली जातात. लॉग बुकमध्ये दिनांक आणि वेळ आणि भेटीचे कारण याविषयीची नोंद केल्यानंतर यंत्र ठेवलेल्या जागी प्रवेश दिला जातो. मतदानासाठी ही यंत्रे तयार झाली की मग ती निवडणूक निरिक्षक, उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत सुरक्षित खोलीत नेली जातात, उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनाही दिसेल अशा टप्प्यात या खोलीवर पहारा ठेवता येतो.

ईव्हीएम सुसुत्रीकरण ही नवीन पध्दत काय आहे ? ही पध्दत का सुरु करण्यात आली ?
ईव्हीएमच्या अनधिकृत वापर टाळण्यासाठी या यंत्रामध्ये व्यवस्था करण्यात आली असली तरी आणखी खबरदारीचा उपाय म्हणून ईव्हीएमसाठी दोन पातळयांवरील सुसुत्रीकरण पध्दत निवडणूकीत वापरण्यात येत आहे. ठराविक मतदारसंघ/मतदान केंद्रात कुठले ईव्हीएम वापरले जाणार आहे याची माहिती अगोदरच कुणाला कळू नये यासाठी ही पध्दत वापरण्यात आली असून यासाठी ठरवून दिलेल्या जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याच्या अधिकार क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या ईव्हीएमला अनुक्रमांक दिले जातात. त्यानंतर ठराविक मतदारसंघात जे ईव्हीएम वापरायचे आहे ते संगणकीकृत पध्दतीद्वारे सुसुत्रीकरणाद्वारे निवडले जाते. याला प्रथम स्तरीय सुसुत्रीकरण म्हणतात. द्वितीय स्तरीय सुसुत्रीकरण निवडणूक अधिकाऱ्यांकडून केले जाते. त्यानुसार मतदारसंघातील ठराविक मतदान केंद्रावर कुठले ईव्हीएम वापरायचे ते ठरवले जाते.

समजा मतदानाच्या दिवशी जर ईव्हीएममध्ये समस्या उद्भभवली तर अशा प्रकरणात काय उपाय उपलब्ध आहे ?
अशा प्रसंगी क्षेत्रीय अधिकाऱ्याकडून अशी यंत्रे तात्काळ बदलून त्या जागी नवीन यंत्रे बसवले जाते.

ईव्हीएम सीलबंद करण्याची काय पध्दत आहे ? असे का केले जाते? हे कसे केले जाते ?
ईव्हीएमला संपूर्णपणे वेष्टनात गुंडाळले जाते, जेणेकरुन त्याच्या बटणांना कुणालाही हात लावता येणार नाही. त्यावरील “रिझल्ट सेक्शन”लाही सीलबंद केले जाते. त्यामुळे मतमोजणीआधी कुणालाही निकाल कळू शकणार नाही. सीलवर मतदान अधिकाऱ्यांच्या सीलबरोबरच उमेदवार किंवा त्यांच्या एजंटची सही घेतली जाते.

मतदानानंतर मतमोजणीपर्यंत ईव्हीएम कुठे ठेवली जातात ?
मतदानानंतर मतदार संघातील सुरक्षित ठिकाणी मतदान यंत्र ठेवली जातात किंवा जवळपासच्या ठिकाणी जिथे उमेदवार किंवा त्यांचा प्रतिनिधी देखरेख ठेवू शकतो. बहुतेकदा ही यंत्र मतमोजणीच्याच ठिकाणी ठेवली जातात.

ईव्हीएममध्ये मतमोजणी कशी केली जाते ?
मतमोजणी केंद्रामध्ये, जास्तीत जास्त 14 मतमोजणी टेबलांवर ईव्हीएम ठेवली जातात. मतमोजणी करणाऱ्या एजंटसाठी बैठक व्यवस्था अशा पध्दतीने केली जाते की त्या व्यक्तीला ईव्हीएम आणि त्याच्याद्वारे प्रदर्शित होणारी माहिती स्वच्छपणे दिसू शकेल. ईव्हीएमचे “रिझल्ट” बटण दाबल्यानंतर ठरावित मतदान केंद्रावर झालेले एकूण मतदान प्रदर्शित विभागात दिसते आणि त्यानंतर प्रत्येक उमेदवाराला मिळालेली मते क्रमानुसार दिसतात. मतमोजणी कर्मचारी वर्गाव्यतिरिक्त मतमोजणी एजंट कडूनही या गोष्टींची नोंद केली जाते. प्रत्येक फेरीनंतर त्या फेरीचा निकाल आणि एकूण बेरीज जाहीर केली जाते. फेरीनिहाय्‍ बेरीज करुन निकाल एकत्र केला जातो.

आपल्या देशात मतदान केंद ताब्यात घेणे, निवडणूकीसंदर्भात गैरव्यवहार काही ठिकाणी होत असतात अशा प्रकरणांना अटकाव करण्यात ईव्हीएम उपयुक्त आहे का ?
अशा प्रकरणात जर ईव्हीएमच ताब्यात घेतले गेले तर त्यावर काही मार्ग नाही. तथापि या यंत्रात एका मिनिटात 4 पेक्षा जास्त किंवा एका तासात 300 हून मते नोंदली जाऊ शकत नाही, मतपेटयांमध्ये मात्र कितीही मतपत्रिका टाकल्या जाऊ शकतात. तसेच मतांची लूट करणारे दिसताच मतदान केंद्राध्यक्ष नियंत्रण कक्षातील “क्लोज” बटण दाबून मतदान थांबवू शकतो.

संसद आणि राज्य विधानसभेच्या निवडणुकांसाठी एकाच वेळी ईव्हीएम वापरता येणे शक्य आहे का ?
होय. ईव्हीएमच्या माध्यमातून आणि राज्य विधीमंडळाच्या निवडणुका एकाचवेळी घेता येऊ शकतात. अशा परिस्थितीत संसदीय निवडणुकांसाठी एक आणि विधीमंडळ निवडणुकांसाठी एक अशी दोन स्वतंत्र ईव्हीएम वापरली जाऊ शकतात.

नियंत्रण विभागात हा निकाल किती वेळ राहू शकतो ?
जोपर्यंत पुढच्या निवडणुकांसाठी हे यंत्रे तयार करण्याकरिता हेतूत: स्वच्छ केले जात नाही, तोपर्यंत ईव्हीएमच्या मेरीचिपमध्ये हा निकाल कायम स्वरुपी राहू शकतो. यंत्रातून बॅटरी काढल्याचा परिणाम सत्राच्या मेमरीवर होत नाही.

मतमोजणीच्या वेळी, ईव्हीएमच्या संबंधित दर्शित भागावर निकाल दिसत नसेल तर निकाल कसा बघितला जातो ?
ईव्हीएमच्या उत्पादकांनी ऑक्झिलिअरी डिस्पले युनिट (एडीयू) विकसित केले आहे. नियंत्रण विभागाच्या मूळदर्शित भागात समस्या आढळल्यास या एडीयूच्या मतदतीने हा निकाल शोधला जाऊ शकतो.

बटण पुन्हा पुन्हा दाबून एकापेक्षा जास्त वेळा मतदान करता येते का ?
नाही. एकदा बटण दाबले गेले की ज्या उमेदवाराच्या समोरचे बटण दाबले आहे त्या मतांची नोंद केली जाते. जोपर्यंत मतदान केंद्राध्यक्ष/मतदान अधिकाऱ्यांकडून पुन्हा नियंत्रण विभागचे बॅलेट बटण दाबले जात नाही तोपर्यंत यंत्रात आणखी मतांची नोंद केली जाणार नाही.

विशिष्ट मतदान केंद्राला कुणाला प्राधान्य दिले आहे ते कळू नये म्हणून पूर्वी मतपत्रिका एकत्र केल्या जायच्या. आता प्रत्येक ईव्हीएमची मोजणी एकापाठोपाठ एक करण्यात येते यामुळे प्रत्येक मतदान केंद्राचा यंत्रमान कल सर्वांना समजतो. याबाबत काही करता येईल का ?
ईव्हीएम उत्पादकांनी “टोटलायझर” हे नवीन उपकरण विकसित केले आहे, जे एकाच वेळी विविध नियंत्रण कक्षांना जोडले जाते. त्यानंतर ते प्रत्येक मतदान केंद्रातील एकूण मतसंख्या दाखवते. प्रत्येक उमेदवाराला मिळालेली मते मतदान केंद्राच्या संपूर्ण गटाला दाखवली जातात. वैयक्तिक मतदान केंद्रांना दाखवली जात नसल्यामुळे मतदानाचा कल समजू शकत नाही.

भारतीय ईव्हीएमबद्दल जगाला काय वाटते ?
अमेरिकेपेक्षा भारतीय ईव्हीएम एक साधे यंत्र आहे. अमेरिकेप्रमाणे आपले ईव्हीएम कुठल्याही नेटवर्कला जोडलेले नाही आणि नेटवर्कच्या माध्यमातून नियंत्रित केले जाते.

अंध व्यक्ती ईव्हीएमचा वापर करत कसे मतदान करु शकते ?
इतर अपंग व्यक्तींप्रमाणे अंध व्यक्तीसुध्दा मतदान करण्यासाठी आपल्याबरोबर एका व्यक्तीला मदतीसाठी नेऊ शकतो. ती व्यक्ती मतदान कक्षापर्यंत अंध व्यक्तीबरोबर राहू शकते. याशिवाय बऱ्याच ईव्हीएममध्ये उमेदवाराचा अनुक्रमांक ब्रेललिपीमध्ये लिहिलेला आहे. उमेदवाराचे नाव आणि अनुक्रमांक असलेल्या मतपत्रिकेची प्रतिकृती निवडक मतदान केंद्रांच्या मतदान केंद्राध्यक्षांना उपलब्ध करुन दिलेली आते. अंध व्यक्तीच्या विनंतीनुसार मतदान केंद्राध्यक्ष मतपत्रिकेची प्रतिकृती त्याला दिली जाते. त्यानंतर तो मतदार आपल्या आवडीच्या उमेदवाराचा अनुक्रमांक नोंद करुन ती खोटी मतपत्रिका मतदान कक्षात जाण्यापूर्वी मतदान केंद्राध्यक्षांकडे सोपवतो. आता, या ब्रेल लिपीच्या मदतीने उमेदवाराचा ठराविक अनुक्रमांक यंत्रावर दर्शवित आपले मत नोंदवू शकतो.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..