अमेरिकेतील प्रोग्रामर रे टॉमिल्सन बोस्टनमधील एका रिसर्च कंपनीत काम करत असताना, रे टॉमिल्सन यांनी १९७१ मध्ये पहिला ईमेल पाठवला आणि ईमेलद्वारे संभाषणाला सुरुवात झाली. त्यांचा जन्म २३ एप्रिल १९४१ रोजी झाला. रे टॉमिल्सन यांनी ही कामगिरी केली, तेव्हा इंटरनेटची सुरुवादेखील झाली नव्हती. मात्र जगात ही क्रांती घडायला पुढची २० वर्षं जावी लागली. टॉमिल्सन यांनी @ या साईनचा वापर केला होता जो आजपर्यंत वापरला जातो. टॉमिल्सन यांनी १९६० सालीच SNDMSG या प्रोग्रामद्वारे एकाच कॉम्प्युटरमध्ये एकीकडून दुसरीकडे पत्र पाठवण्याचं तंत्र विकसित केलं होतं. यात मेल कम्पोज करून, त्यावर पत्ता लिहून ते दुसऱ्या युजरला पाठवण्याची व्यवस्था होती.
थोर प्रतिभावंत व ‘कल्ट फिगर’ असूनही निगर्वी आणि मनमिळावू स्वभावामुळे रेमण्ड माहिती तंत्रज्ञानाच्या विश्वात प्रिय व आदरणीय होते. अनेक पुरस्कार आणि सन्मानांनी टॉमलिन्सन यांना गौरविण्यात आले होते. सन २०१२ मध्ये ‘इंटरनेट हॉल ऑफ फेम’मध्ये त्यांना सन्मानपूर्वक स्थान देण्यात आले. प्रत्येकाचा ई-मेल अॅड्रेस लिहिण्याची ठराविक पद्धत जगन्मान्य झाली आहे. त्यात सुरुवातीस युजरनेम व नंतर त्याचा पत्ता अशी रचना असते. या दोन्हींच्या मध्ये @ हे चिन्ह सर्वप्रथम वापरण्याचे श्रेयही टॉमलिन्सन यांच्याकडेच जाते. रे टॉमिल्सन यांचं ५ मार्च २०१६ रोजी निधन झालं.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply