श्रीराम ताम्रकर यांचा जन्म ९ नोव्हेंबर १९३८ रोजी झाला.
श्रीराम ताम्रकर हे त्यांच्या चाहत्यांमध्ये ‘चित्रपटसृष्टीचा विश्वकोश’ म्हणून लोकप्रिय होते. मध्य प्रदेश सरकारच्या सांस्कृतिक विभागाने २०१० मध्ये दादासाहेब फाळके अकादमीचा ‘ज्येष्ठ चित्रपट पत्रकार पुरस्कार’ आणि ‘बेस्ट फिल्म क्रिटिक’ पुरस्कार यांच्यासह त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
श्रीराम ताम्रकर राज्यातील पहिल्या आदिवासी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे ज्यूरी म्हणून काम केले होते.
श्रीराम ताम्रकर यांनी ५० हून अधिक पुस्तके लिहिली होती. हिंदी चित्रपटांच्या ज्ञान कोशाचे काम त्यांनी केले होते.
श्रीराम ताम्रकर यांचे निधन १४ डिसेंबर २०१४ रोजी झाले.
Leave a Reply