ज्या ग्रंथींचा स्राव नलिकेशिवाय थेट रक्तात उतरतो अशा ग्रंथी अंतःस्रावी ग्रंथी, शरीराचे सर्व व्यवहार नियंत्रित करणाऱ्या या ग्रंथी बारा प्रकारच्या असतात. याचे सर्व कार्य रासायनिक संकेतावर शीघ्रतेने चालते. १) पियुषी ऊर्फ पोषग्रंथी (पिच्युइटरी) कवटीच्या आतील खालच्या भागात जतूक अस्थीच्या खड्यासारख्या भागात अधोअभिवाहीमस्तिषक केंद्राखाली (हायपोथॅलॅमस) ही ग्रंथी असते.
आकार वाटाण्यासारखा, रंग गुलाबी, १.३ सें. मी. आकाराची ही ग्रंथी ०.५ ग्रॅम पोषग्रंथीचे तीन भाग असतात. अग्रभाग- यात पाच प्रकारच्या पेशी असतात. त्या सात प्रकारची संप्रेरके निर्माण करतात. मागच्या भागात मुख्यत्वे चेतातंतू असतात. त्या भागांना जोडणारी जोडणी. पोषग्रंथी म्हणजे सर्व अंतःस्रावी ग्रंथींच्या वाद्यवृंदावर नियंत्रण ठेवणारी संचालक ग्रंथी. शरीराच्या वाढीपासून जननक्षमतेपर्यंत नियंत्रण करते.
(२) अधोअभिवाहीमस्तिष्क केंद्र- (हायपोथॅलॅमस) मेंदूच्या अगदी आतील भागांत थॅलॅमसच्या खालच्या भागात वसलेले केंद्र. ९ प्रकारची | संप्रेरके निर्माण करणारा हा भाग. शरीराच्या वाढीवर व अवटु ग्रंथीवर परिणाम करणारी संप्रेरके. ३) तृतीयनेत्र ग्रंथी (पिनियल ग्रंथी) मोठ्या
मेंदूच्या मधल्या भागात आतील भागात वसलेली लहानशी ग्रंथी. या ग्रंथीचे नक्की काय अजूनही संपूर्णपणे समजले नाही; पण ही मेलॅटोनिन हा जैविकचक्र नियंत्रण करणारा संप्रेरक स्रवते. काळोखात हा जास्त प्रमाणात स्रवला जातो. ४) अवटु ग्रंथी (थायरॉइड) फुलपाखराच्या आकाराची ही ग्रंथी मानेच्या पुढच्या भागांत स्वरयंत्र व श्वास नलिकेच्या पुढे असते. या ग्रंथीचे वजन ३० ग्रॅम असून, या ग्रंथीला रक्तपुरवठा खूप असतो. मिनिटाला ८० ते १२० मि. लि. ही एकमेव अंतःस्रावी ग्रंथी जी आपली संप्रेरके मोठ्या प्रमाणात साठवू शकते. १०० दिवसांचा साठा करू शकते. मुख्यत्वे तीन संप्रेरके निर्माण केली जातात. टी ३, टी ४ ही चयापचय क्रियेवर नियंत्रण ठेवतात. कॅलसिटोनीन- कॅलशियम व फॉस्फरस यांचे नियंत्रण करते. हे स्राव पुढील गोष्टींचे नियंत्रण करतात.
१) आधार चयापचयाचा वेग (बेझल मेटॅबोलिक रेट) ऑक्सिजनचा शरीरातील वापर, २) पेशीय चयापचय ३) शरीराची वाढ व विकास. ५) परावटू ग्रंथी- (पॅराथायरॉइड) अवटुग्रंथीच्या पार्श्वभागावर वरच्या व खालच्या भागांवर ही ग्रंथी असते. एकच संप्रेरक- पॅराथॉर्मोन निर्माण करते.
याचे कार्य रक्तातील कॅल्शियम व ‘फॉस्पसचा ताळमेळ साधणे. पॅराथॉर्मोन अस्थिशोषक पेशींचे कार्य उत्तेजित करते. ६) यौवनलिपी ग्रंथी- ही ग्रंथी छातीच्या पिंजऱ्यात हृदयाच्या पुढच्या भागात असते. यातील संप्रेस्क थायमोसीनमुळे पांढऱ्या पेशीतील टी-लसीकोशिका पक्क होतात व वाढतात. त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढते व जिवाणू-विषाणूंचा नाश होतो. ५० व्या वर्षानंतर संप्रेरक निर्मिती थांबते.
-डॉ. शशिकांत प्रधान
मराठी विज्ञान परिषद
Leave a Reply