काल सकाळी दादर वरून लालबागला जाण्यासाठी ट्रेन पकडली..ट्रेनमधे फारशी गर्दी नव्हती..आत गेलो तर चार पोलिस शिपाई दोन पोलिस डाॅग्सना घेऊन उभे होते..मस्त राजबिंडे कुत्रे होते..एक लॅब्राॅडाॅर आणि एक लांड्या शेपटीचा डाॅबरमन..छानपैकी दरवाजात उभे होते..मी त्या शिपायांना त्या कुत्र्यांची नांवं विचारली. एकाचं ‘मार्शल’ आणि दुसऱ्याचं ‘डॅन’..
पोलिसांची आपसात चर्चा चालू होती..तेवढ्यात स्टेशन आल्याने एका पोलिसांने त्याच्याकडे असलेल्या कुत्र्याला, डाॅबरमनला, दरवाजातून बाजूला व्हायला आदेश द्यायला सुरूवात केली..प्रथम हिन्दीतून आणि मग इंग्रजीतून..! गायीच्या वासराएवढा तो धिप्पाड कुत्रा तंतोतंत त्याचा आदेश पाळत होता..
मी विचारलं, ‘आप उसे कौनसी भाषा मे आॅर्डर देते हो?’..
पोलिस म्हणाला, ‘हिन्दी नही तो अंग्रेजी मे से’..
मी पुढे विचारलं, ‘ उसे अंग्रेजी समझती है?’..
पोलिस, ‘ आदत होती है, असे हिन्दी, अंग्रेजी और थोडी थोडी मराठी भी समझती है, सब आदत की बाते है..’
हा संवाद ऐकल्यावर मला उगाचंच केवळ ‘इंग्लिश’ शिकण्यासाठी दहा वर्ष ‘इंग्रजी’ माध्यमात शिकणारी ‘मराठी’ मुलं आठवली..!
— गणेश साळुंखे
Leave a Reply