इंग्रजी रहस्यकथाकार अर्ल स्टेनले गार्डनर यांचा जन्म १७ जुलै १८८९ रोजी झाला.
अमेरिकी इंग्रजी रहस्यकथा वाचणाऱ्यांमध्ये ‘पेरी मेसन’ हे पात्र परिचयाचे असेलच. अर्ल स्टॅन्ले गार्डनर या कादंबरीकाराने एक निष्णात फौजदारी वकील म्हणून रंगवलेले हे पात्र. गार्डनरने इतर विविध प्रकारचे लेखन केलेले असले, विशेषत: त्याने उत्तम प्रवासवर्णने लिली असली, तरी मुख्यत: ओळखला जातात ते पेरी मेसन मालिकेतील कादंबऱ्यांसाठीच.
१९३० च्या दशकात गार्डनरने उदयास आणलेले पेरी मेसन हे पात्र मेसन मालिकेतील रहस्यमय कादंबऱ्या आणि त्यांवरील सिनेमांमुळे एके काळी अमेरिकी वाचक-प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. याच मेसन मालिकेतील ‘द केस ऑफ द क्रुकेड कँडल’ ही बाळ भागवत यांनी अनुवादित केलेली कादंबरी मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केली आहे. निष्णात वकील असलेल्या पेरी मेसनची गुन्ह्य़ाचा शोध घेण्याची त्याची अशी खास शैली होती. एका गुन्ह्य़ाबद्दल मिळालेल्या माहितीच्या आधारे त्याच्याशी निगडित दुसऱ्या मोठय़ा गुन्ह्य़ाचे धागे उसवत गुन्हेगारी प्रवृत्तींना कायद्याद्वारे शिक्षेपर्यंत पोहोचवणे ही मेसनची शोधशैली. ‘द केस ऑफ द क्रुकेड कँडल’ ही रहस्यमय चातुर्यकथाही मेसनच्या या शोधशैलीचा प्रत्यय देणारी आहे.
अर्ल स्टेनले गार्डनर यांचे निधन ११ मार्च १९७० रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply