इनिड ब्लायटन ही बच्चेकंपनीला आवडणाऱ्या सुरस साहसकथांची लेखिका. त्यांचा जन्म ११ ऑगस्ट १८९७ रोजी डलीचमध्ये झाला. वडिलांच्या प्रोत्साहनामुळे तिने लहानपणापासूनच मासिकांमधून लिहायला सुरुवात केली होती. स्वतंत्र बाण्याच्या साहसी मुलामुलींच्या कथा, शाळा आणि बोर्डिंग हाउसमधले मुलांचे धमाल अनुभव आणि फँटसी जगतातल्या कथा हे तिचे आवडते विषय होते.
तिने ८००हून अधिक पुस्तकं लिहिली आणि ती जगभर ९० भाषांमध्ये भाषांतरित झाली. तिची पुस्तकं कायमच ‘बेस्टसेलर्स’ यादीत असत आणि त्यांचा एकत्रित खप ६० कोटींच्या घरात जातो.
लिटल नॉडी (२४ पुस्तकं), दी अॅडव्हेंचरस फोर (दोन पुस्तकं), फेमस फाइव्ह (२१ पुस्तकं), सिक्स कझिन्स (दोन पुस्तकं), सिक्रेट सेव्हन (१५ पुस्तकं), बार्नी मिस्टरीज (सहा पुस्तकं), दी विशिंग चेअर कलेक्शन (तीन पुस्तकं), दी मॅजिक फारअवे ट्री, दी आयलंड ऑफ अॅडव्हेंचर, सिक्रेट सीरिज (पाच पुस्तकं), नॉटिएस्ट गर्ल (तीन पुस्तकं), फाइव्ह फाइंडआउटर्स अँड डॉग मिस्टरी सीरिज (१५ पुस्तकं), सेंट क्लेअर्स (सहा पुस्तकं), मिस्टर गॅलिआनोज सर्कस (तीन पुस्तकं) आणि मॅलरी टॉवर्स (सहा पुस्तकं) अशी तिची पुस्तकं प्रमुख व्यक्तिरेखांवर आधारित आहेत आणि याशिवाय इतरही पुष्कळच! इनिड ब्लायटन यांचे २८ नोव्हेंबर १९६८ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply