नवीन लेखन...

उद्यमी कलाकार – मयुर धुरी

” कला, उद्योगी आणि नेतृत्वाची वृत्ती व गुण माणसामध्ये असले की यशाचे शिखर गाठण्यापासून त्या व्यक्तिला कोणीच थांबवू शकत नाही आणि जर का बालवयापासूनच हे सूत्र त्याच्याकडे असेल तर समाजातील भारदस्त व्यकतीत्त्व म्हणून त्याची ओळख निर्माण होऊ शकते ! निमकी हीच “त्रयी” मयुर धुरीकडे असल्यामुळे ” एक गुणवान कलाकार व मॉडेल ” , ” कुशल संघटक ” , आणि ” उत्तम व्यावसायिक “म्हणून नाव सर्वश्रुत होतयं त्याच्या कला कारकिर्दी विषयी आणि श्री शककर्ते प्रतिष्ठानच्या कार्याची माहिती या मुलाखतीतून ”

लहानपाणापासून मयुरला विविधांगी नकला करून त्यातून इतरांचं मनोरंजन करण्याची आवड होती, त्याच सोबत अभिनय क्षमता आणि ” फोटोजिनिक फेस ” यामुळे टी.व्ही.च्या जाहिरातींमध्ये बालकलाकार म्हणून काम करण्यासाठीचे दरवाजे खुले झाले. अर्थात त्याच्यातील कलाकाराला पैलू पाडण्याचं काम ज्येष्ठ नाट्यकर्मी विद्याताई पटवर्धन यांनी केल्याचं मयुर आवर्जुन सांगतो.

याशिवाय घरातून कलाक्षेत्रासाठी मार्गदर्शन मिळाल्यामुळे मतुरचा या क्षेत्रात सहजगत्या प्रवेश होऊ शकला; पण या क्षेत्रात वावरायचं तर रंगभूमीपासूनच सुरुवात होणं गरजेचं आहे ही बाब ओळखून अगदी महाविद्यालयीन जीवनापासून एकांकीका स्पर्धा तसंच नाटकांमधून काम करायला सुरुवात केली आणि पदार्पणातच चमकदार परफॉर्मन्स दाखवत कौतुकाची थाप तर त्याने मिळवलीच शिवाय अनेक नाटकांसाठी सर्वोतकृष्ट अभिनेता म्हणून अनेक राज्यस्तरीय पारितोषीकं त्याने पटकावली असून ” एप्रिल फुल ” , ” इथे वेळच महत्त्वाची ” या नाटकांचा समावेश आहे. या दोन्ही नाटकांमध्ये मयुरने महत्त्वपूर्ण भुमिका साकारल्या आहेत. याव्यतिरिक्त ” आभास हा ” , ” लक्ष्य ” , ” देवयानी ” , ” इन मीन तीन ” , ” कुटुंबकथा “; अश्या मालिकांमधून देखील मध्यवर्ती व सहकलाकाराच्या भूमिका साकारल्या असून काही वर्षांपूर्वी ” दे धमाल ” या लहान मुलांवरील गाजलेल्या मालिकेत बालकलाकाराच्या भुमिकेतून आपल्या कलेची चुणूक मयुरने दाखवून दिली आहे. सध्या अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये मध्यवर्ती व्यक्तीरेखांसाठी त्याचे काम सुरू आहे

अभिनय व इतर कलांच्या बरोबरीनं स्वत:च्या व्यवसायाविषयी सुध्दा मयुर धुरी सांगतो की ” दिवाळी तसंच इतर सणांसाठी लागणार्‍या खाद्यपदार्थांची विक्री केली जाते, यासाठी अनेक गृहिणींकडून हे पदार्थ बनवले जातात आणि मग त्याची विक्री करण्यात येते; यामुळे अनेक तरुणांना रोजगार आणि उद्योग करण्याचा आत्मविश्वास मिळत रहातो “.

त्याचसोबतच ” श्री शककर्ते प्रतिष्ठानच्या ” या संघटनेचा अध्यक्ष म्हणून अनेक लोकपयोगी कार्य मयुर धुरी करत असून यामध्ये प्रामुख्याने ‘ रोजगार ‘ , ‘ देशप्रेम ‘ , ‘ छतपती शिवाजी महाराजांचे विचार सामाजातील तळागळापर्यंत पोहचवणे ‘ , ‘ आरोग्य शबीरं ‘ राबवणे असे उपक्रम हाताळले जात असून या कार्यासाठी महाराष्ट्रातील अनेक तरूणांकडून उदंड प्रतिसाद मिळत असून, भविष्यात देखील शककर्ते प्रतिष्ठानचे कार्य अधिक जोमाने करणार असल्याचे तो नमूद करतो ;

‘ संघटन ‘ , ‘ वाक् चातुर्य ‘ तसंच ‘ कलासक्त ‘ या गुणांमुळे मयुर धुरीचं व्यक्तीमत्त्व प्रभावित करेल असेच आहे. त्यामुळे आजच्या तरुणवर्गासमोर मयुर धुरी हे नाव मार्गदर्शक व प्रेरणास्त्रोत ठरेल यात काहीच शंका नाही.

 

Avatar
About सागर मालाडकर 111 Articles
श्री. सागर मालाडकर हे आकाशवाणीवरील निवेदक असून ते मराठीसृष्टीसाठी नियमितपणे लेखन करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..