नवीन लेखन...

एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ स्थापना दिन

महिलांनी शिकावे, स्वावलंबी व्हावे ही उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेऊन महर्षी डॉ. धोंडो केशव कर्वे यांनी २ जुलै १९१६ रोजी श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाची स्थापना केली. भारतातीलच नव्हे तर मध्य पूर्व आशियातील केवळ महिलांसाठी असलेले हे पहिले विद्यापीठ आहे.

१९२१ मध्ये या विद्यापीठातून पाच महिला पदवीपर्यंतचे शिक्षण घेऊन उत्तीर्ण झाल्या. या विद्यापीठाचे मुख्य केंद्र चर्चगेट येथे तर उपकेद्र मुंबईतील जुहू आणि पुण्यातील कर्वे रोड येथे आहे. भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे या थोर समाजसुधारकाने लावलेल्या या बीजाचा आता महावृक्ष झाला आहे, अश्वत्थाप्रमाणे लक्षावधी स्त्रियांच्या जीवनात शीतलता आणली आहे.

डिसेंबर १९१५ मध्ये महर्षीनी इंडियन सोशल काँग्रेसच्या (भारतीय सामाजिक परिषद) अध्यक्षीय भाषणातून महिला विद्यापीठाची कल्पना सर्वप्रथम मांडली. जपानमध्ये १९०० साली स्थापन झालेल्या आणि अतिशय वेगाने वाटचाल करीत असणाऱ्या महिला विद्यापीठाच्या माहितीमुळे महर्षी अतिशय प्रभावित झाले होते. त्यांनी या भाषणात प्रस्तावित महिला विद्यापीठासाठी चार महत्त्वाची प्रमेये मांडली.
१. आपण जबाबदार व्यक्ती आहोत ही भावना व आपल्या सामर्थ्यांविषयी आत्मविश्वास ज्यायोगे उत्पन्न होईल असे पुरुषसामान्य शिक्षण स्त्रियांना देणे.
२. आपल्या देहाचे घटक ज्याप्रमाणे भिन्न भिन्न पेशी, त्याप्रमाणे समाज किंवा राष्ट्ररूप देहाचे घटक जी कुटुंबे ती जोमदार व मनोहर बनविणे, हे मुख्यत: कुटुंबाच्या सूत्रधार ज्या स्त्रिया त्यांच्यावर अवलंबून आहे. तसे सामर्थ्य ज्या शिक्षणाच्या योगाने स्त्रियांमध्ये उत्पन्न होईल असे शिक्षण त्यांना देणे.
३. आपण राष्ट्राचा घटक आहोत ही भावना ज्या शिक्षणाने उत्पन्न होईल, असे शिक्षण स्त्रियांना देणे.
४. स्त्रियांनी अमुक करावे किंवा तमुक करू नये अशा रीतीचे कायद्याने किंवा समाजाने घातलेले र्निबंध काढून टाकले पाहिजेत. कोणत्याही स्त्रीला अमुक विद्या आपण शिकावी किंवा अमुक उद्योग आपण करावा असे वाटेल तर कायद्याची अगर समाजाची बंधने तिच्या मार्गात आडवी येऊ नयेत.

महर्षीनी १९१५ साली मांडलेली स्त्री शिक्षणविषयक प्रमेये आजच्या एकविसाच्या शतकातील भारतीय स्त्री शिक्षणालाही तितक्याच प्रखरतेने लागू पडतात. ३ जून १९१६ रोजी महिला विद्यापीठाची औपचारिक स्थापना झाली, परंतु पाच विद्याíथनींचा पहिला वर्ग मात्र ५ जुलै १९१६ रोजी सुरू होऊन विद्यापीठाच्या खऱ्या कामाला आरंभ झाला (आत्मवृत्त).

महर्षीच्या द्रष्टेपणाची महती अशी की, ज्या काळी स्त्री साक्षरतेचा दर १.८१ टक्के होता, त्या गहिऱ्या अंधाराच्या काळात त्यांनी स्त्रियांना उच्चशिक्षणाची दारे खुली केली. १९१६ साली स्थापन झालेले हे भारतातील पहिले महिला विद्यापीठ ५ जुलै २०१५ या दिवशी शतसांवत्सरिक वर्षांत पदार्पण करील. या शंभर वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीत या विद्यापीठाने खूप मोठी झेप घेतली आहे, लक्षावधी स्त्रियांचे जीवन उजळले आहे, त्यांची स्वप्ने साकार करण्यासाठी साथ दिली आहे, उंच आकाशात भरारी घेण्यासाठी त्यांच्या पंखांना बळ दिले आहे.

महर्षींच्या या मोलाच्या स्त्री शिक्षणाच्या कार्याने प्रभावित होऊन सर विठ्ठलदास ठाकरसी या उदारमनस्क उद्योगपतींनी १५ लाख रुपयांची मोठी देणगी दिली आणि स्त्री शिक्षणाच्या कार्याला वेगाने चालना मिळाली. महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल, सरोजिनी नायडू अशा भारतीय राजकीय आणि सामाजिक जीवनावर प्रभाव पाडणाऱ्या महनीय व्यक्ती विद्यापीठाच्या पदवीदान समारंभास आवर्जून उपस्थित होत्या. यातच त्यांना महिलांच्या उच्च शिक्षणाच्या प्रति असलेली कळकळ दिसून येते.

आज विद्यापीठाचे दूरस्थ शिक्षण केंद्र हजारो विद्यार्थीनींना २८ पदवी/पदविका अभ्यासक्रम देत आहे. केवळ छापील स्वयंअध्ययन साहित्यावरच भर न देता नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून Video lectures, Internet Radio, Online learning यांच्या माध्यमातून विद्यार्थिंनींपर्यंत गुणवत्तापूर्ण अभ्यासक्रम पोहोचविण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न आहे.

संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..