रूप असे देखणेकाळजां भिडले भारी,
डोळे असती लकाकते,
पाणीदार जसे मोती,
काया कशी तुकतुकीत,
नजर फिरता हाले,
सुंदर तांबूस वर्ण,
त्यावर पांढरे ठिपके,
शिंगांची नक्षी डोई,
दिसते वर शोभुनी,
हिंडते बागडते रानी,
कुणी बालिका की हरणी, –??
चपल चंचल वृत्ती,
अचूक आविर्भाव मुखी,
क्षणोक्षणी मान वेळावी,
भय दाटले नयनी,–!!!
पाय मजेदार हलती,
नाजुकसे ते हडकुळे,
पण त्यात ताकद किती,
खुट्ट वाजता वाऱ्यावरती,–!!!
चरत चरत कुरणी,
हिरव्या गवतावर निवांत,
सारखी ही हले डुले ही,
गोजिरवाणी बघा हरिणी,–!!!
भोवती बाळे करिती घोळका त्यांच्याकडेच ना ध्यान,
हलवून इवली शेपूट,
शिकवे जगण्याचे ज्ञान, –!!!
जागरूक राहून सारखी,
भोवती नजर भिरभिरत राहे,
सभोवती हरणें सगळी,
पाहून मग जीव शांतावे,—!!!!
हिमगौरी कर्वे.©
Leave a Reply