हीथ्रो, लंडन येथील अँट्रीयम हॉटेल मधला दोन रात्रींचा मुक्काम आटोपून तिस-यादिवशी सकाळी युरोस्टार, समुद्रातील बोगद्यातूत जाणा-या, ट्रेननी पँरीसमधे अंदाजे साडे अकरा वाचता दाखल झालो. युरोस्टारच्या शेवटच्या स्टेशनला उतरुन कोचनी तडक जेवणासाठी वेलकम इंडीया या हॉटेलमधे गेलो.
जाताना वाटेतच पँरीस शहराबद्दल काही निरीक्षणे करत गेलो. लंडनच्या तुलनेत शहरात प्रवेश करतानाचा वाटेत दिसलेला भाग कंजसटेड वाटला. काही भाग पँरीस खूर्द किंवा पँरीस बुद्रुक असा वाटायचा. नव्या जुन्या लोकवस्तीच्या घरांच्या खिडक्या व दारांसमोर अगदी भिंतीलगत छज्यासद्रुष्य नक्षिदार प्रकार हटकुन दिसला. एक दोन ठिकाणी एकाच ठिकाणाहुन आठ वेगवेगळ्या ठिकाणी फुटलेले रस्ते पाह्यले; आधी कुठेच अस पाहिलेल नाही. जेवण झाल्यावर ऐतिहासिक वास्तू पहाण्यासाठी बाहेर पडलो तेंव्हा पँरिसच वेगळच भव्य दीव्य रुप दिसले. भव्य रस्ते, स्थापत्यकलेचे एकसेएक पुरातन आणि नवीन नमुने बघुन तर मन प्रसन्न झाल. अत्त्याधुनिक तंत्रज्ञान आणि सौंदर्यदृष्टी यांचा मिलाफ इथे जागोजागी पहायला दिसला.
आज एक दुसरीच गाईड आमंत्रित केली होती. तिच्या म्हणण्यानुसार आपल्या पध्दतीने जगूपहाणा-या आनंदी फ्रेंच लोकांच पँरीस हे शहर आयफेल टाॅवरच्या पायथ्याभोवती वसलय. बदललेल्या प्रत्येक राजाने येथील मूळ बांधकामात कलात्मक बदल करत प्रत्येक वास्तूच्या काळजीपूर्वक जतनासाठी योगादान दिले आहे. ही फ्रेंच मंडळी पर्यटन स्नेही असुन नेपोलियन, फ्रेंच राज्यक्रांती, लुव्र म्युझियम, आयफेल टाॅवर, फ्रेंच वाईन या सगळ्याचं कमालीच कौतुक असत त्यांना. आपल्या भाषेचा प्रचंड आभिमान असणारे हे फ्रेंच लोक सर्व व्यवहार त्यांच्याच भाषेत करतात. दुकानावरील पाट्या, वाहतुकीसंबंधी सूचना वगैरे सर्व काही फ्रेंचमधेच असते. इंग्लिश स्पेलिंगप्रमाणे फ्रेंच शब्दांचा उच्चार कधीच करायचा नसतो.
आजच्या सीटी टूरच्या निमित्ताने लुव्र म्युझियम Champs Elysees, Place de la Concorde, L’Arc De Triomphe – victory monument वगैरे पाहून झाल्यावर आयफेल टॉवर या प्रमुख आकर्षणासाठी तीन तास आरक्षित केले होते. टॉवरच्या सेकंड लेव्हलवरुन सर्व बाजूनी डोळे भरुन पँरीस पाह्यल.
Leave a Reply