लाडाचं कोडाचं आमचं evergreen ‘दादर’
आमच्यासाठी तर ते जणू Godfather |
दादर म्हणजे मुंबईच्या ‘पाठीचा कणा’ ,
टिकून आहे तिथे अजून ‘मराठीबाणा’ |
उच्च वर्गिय, उच्च शिक्षितांचा डौल इथला देखणा,
मध्यमवर्गीय चाळसंस्कृतीने जपल्यात पाऊलखुणा |
‘शिवाजीपार्क’ म्हणजे आमच्या दादरची ‘जान’
शिवाजीमंदिर, प्लाझा, आमच्या दादरची ‘शान’ |
मध्य पश्र्चिम रेल्वेचा ‘केंद्रबिंदू’ दादर
दादर T.T., रानडेरोड, चौपाटीचा आम्हां आदर |
माहिम आणि माटूंगा दादरचाच गाभा,
दादरला रक्षाया “सिध्दीविनायक” उभा |
अशा खास वैशिष्ठांनी, ताठ आमची मान,
“सावरकरांच्या” भूमीचा आम्हा दादरकरांना अभिमान |
— सौ. अलका वढावकर
Leave a Reply