इंग्रजाळलेल्या मराठी माणसांनी केलेलं वारीचं वर्णन… हसावं की चिडावं की मराठीसाठी रडावं?
“… अग बोलता बोलता तुला सांगायलाच विसरले , लास्ट विकेंड कि नाही आम्ही एक भारी गोष्ट केली, मी आणि नितीन त्या वारी प्रोसेशन मध्ये गेलो होतो, काय सांगू यू नो , एक अगदी ऑस्सम एक्सपेरियन्स. नितीन च्या ऑफिस चे पण सगळे हिंजेवाडी होऊन संडे ला दुपारी आले होते, त्यांच्या ‘स्पाऊस’ ला घेऊन. काय धमाल केली आम्ही. सगळ्यांनी ठरवून ट्रेडिशनल मराठी सारी घातली होती यू नो, ती जरीचे काठवाली, काय ते नऊवार म्हणतात ना , त्या मराठी ट्रेडिशनल डान्स करताना घालतात ना तशी … येस अगदी त्या ‘पिंगा’ गाण्यात आहे तशी … ए पण दीपिका पेक्षा प्रियांका भारी दिसते हा त्या आऊटफिट मध्ये… ज्यांच्या घरी इनलॉज आहेत त्यांना काही प्रॉब्लेम नव्हता, त्यांनी नेसवून दिली पण आम्ही बऱ्याच जणींनी रेडिमेड आधीच विकत आणल्या.
सच या फन, याह.. तू असायला हवी होती.. अँड वी वेन्ट देअर, सच ए क्राउड बट इट वॉज फन … आणि मग आम्ही ते होली बेसिल प्लांट्स पण घेतले विकत आणि डोक्यावर घेऊन चाललो त्यांच्या बरोबर… माहित नाही का करतात , जस्ट या ट्रेडीशन … नितीन नि पण एक व्हाईट लॉन्ग शर्ट जीन्स वर घातला आणि वर यू नो ती व्हाईट कॅप , या तीच ती मागे नाही का घेतली होती ‘मै अण्णा हू’ लिहलेली , तीच , पण ती उलटी करून घातली. आणि फोरहेड वर तो टीका , ऑरेंज ब्लॅक कलर चा. चाललो मग आम्ही पण सगळे , विठ्ठल विठ्ठल म्हणत.. ग्रेट फन. पण प्रोसेशन मॅनेजमेंट एकदम बेकार यू नो युसलेस गव्हर्नमेंट फेलोज , मिनरल वॉटर पण नाही साधे कुठे , तरी बर नितीन नि आधीच प्रेडिक्त केले होते आणि बिसलेरी च्या बाटल्या बरोबर ठेवल्या होत्या… मस्त एक्सपेरिअन्स , पण ती रुरल क्राउड फारच अग्ली , साधे डियो मारायला काय होते.
मला वाटते नेक्स्ट ईर पासून त्यांनी अरबन आणि रुरल क्राउड च्या सेपरेट लाईन्स कराव्यात. आणि गाडी पार्क करायला जागाच नव्हती , ड्राइव्हर ने इतक्या लांब नेऊन ठेवली ना कि मग आम्ही सरळ ओला बुक करून घरी गेलो.बट इट वॉज फन, अगदी ऑस्सम एक्सपेरियन्स. पुढच्या वर्षी इशिता ला पण घेऊन जाईन , ह्या वर्षी टेंथ आहे ना , क्लास्सेस आल्रेडी सुरु झाले आहेत. मुलांना आपले रिच कल्चर आणि ट्रेडीशन माहिती पाहिजेच ना…तू पण ये इथे असली तर नेक्स्ट यर ला .. चल ठेवते , बाय …”
आता याला काय म्हणावे माऊली..!!
जय हरी माऊली
Leave a Reply