प्रयोगशील शेतकरी राजेंद्र पवार यांनी बारामती अग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या माध्यमातून जागितक पातळीवरील प्रयोगशील शेती बारामतीत केली आहे. कृषी, शैक्षणिक, औद्योगिक, सामाजिक अशा सर्वच क्षेत्रात नवनव्या संकल्पना त्यांनी राबविलेल्या आजपर्यंत दिसून आल्या आहेत. राजकारणात नसले तरी त्यांची अशी एक वेगळी ओळख आहे.
राजेंद्र पवार यांचा जन्म १७ जूनला झाला.
राजेंद्र पवार हे राजकारणापासून दूर असले तरी विविध क्षेत्रात त्यांनी अनेक प्रयोग केले आहेत. राजेंद्र पवार म्हणजे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे चुलत बंधू. राजेंद्र पवार यांचे वडील पद्मश्री आप्पासाहेब पवार हे देशाचे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे बंधू. आमदार रोहित पवार हे राजेंद्र पवार यांचे सुपुत्र आहेत.
रोहित पवार यांच्या राजकीय वाटचालीतही त्यांनी नेहमीच त्यांना साथ दिली आहे. ते नेहमीच प्रसिद्धीपासून दूर असतात.
‘कृषि क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल राज्याच्या कृषी विभागाच्या वतीने देण्यात येणारा ‘डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार – २०१९’ राजेंद्र पवार यांना मिळाला आहे.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply