नवीन लेखन...

दूरदर्शनचे प्रयोगशील निर्माते अरुण काकतकर

जन्म. २४ एप्रिल १९४७

अरुण काकतकर हे एक चालते बोलते सांस्कृतिक केंद्र आहे. ते दूरदर्शन वर नोकरीत असताना त्यांचे मुंबईतले घर म्हणजे अनेक मराठी कलाकारांचे मुंबईत उतरण्याचे हक्काचे ठिकाण होते. अरुण काकतकर हे नांव आता पन्नाशीच्या अलिकडे पलिकडे असणाऱ्या सर्व मराठी माणसांच्या डोळ्यांपुढचं नांव. सत्तर आणि ऐंशीच्या दशकांत दूरदर्शनच्या सुवर्णकाळातले ते निर्माते. प्रतिभा आणि प्रतिमा, सुंदर माझं घर अशा नुसत्या नावांनीही या पिढीच्या अंगावर रोमांच उभे राहतात. प्रतिभा आणि प्रतिमा, सुंदर माझं घर, युवदर्शन, शब्दांच्या पलीकडले, सायन्स् रिपोर्ट्, नाटक, स्पोर्टस् राउंड अप,आरोही या सर्वाचे निर्माते असायचे अरुण काकतकर.

दूरदर्शनवर सुमारे पंधरा वर्षे अनेक मालिकांची निर्मिती आणि इतर सेवा केल्यानंतर १९८७ ते २००५ पर्यत अरुण काकतकर यांनी ‘बालचित्रवाणी’चे निर्मिती उपप्रमुख म्हणून काम बघितले होते, तेव्हा अरुण काकतकर यांनी दहा वर्षे स्वतःला बालचित्रवाणी मध्ये लहान मुलांचे मनोरंजन करत वाहून घेतले होते.

दूरदर्शनच्या दर्जेदार कार्यक्रमांचे निर्माते म्हणून काम करत असताना अरुण काकतकर यांनी स्मिता पाटील, लक्ष्मीकांत बेर्डे अशांना दूरदर्शन वर आणले. त्यांनी दूरदर्शनवर पु लं देशपांडे, सुधीर फडके (बाबुजी) आणि ग. दि. माडगुळकर (अण्णा) मैफील जमवली होती. अरुण काकतकर यांनी विनय धुमाळे, सुधीर गाडगीळ, समीरण वाळवेकर यांना कायम प्रोत्साह्नन दिले.आरोही हा कार्यक्रम त्यांनी एक वर्ष सादर केला व त्यातील पहिला कार्यक्रम लता मंगेशकर यांचा होता. जितेंद्र अभिषेकी, आशाताई, लतादिदींना दूरदर्शनवर लाईव्ह आणण्याचे श्रेय अरुण काकतकर यांना जाते.

दिग्दर्शक अंकुर काकतकर हे त्यांचे चिरंजीव आहेत. अंकुर काकतकर यांनी अनेक नाटके व चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. गोंद्या आला रे वेब सिरीज मालिकेचे दिग्दर्शन अंकूर काकतकर यांनी केले आहे. ढोलताशे या चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे.

अरुण काकतकर यांच्या कडे अनेक जुन्या दर्जेदार कार्यक्रमांच्या दुर्मिळ ध्वनिचित्रफिती आहेत. विदुषी माणिक वर्मा, डॉ. वसंतराव देशपांडे, पंडित भीमसेन जोशी, सुरेश भट,पंडित जितेंद्र अभिषेकी, पंडित हृदयनाथ मंगेशकर, आशाताई भोसले, किशोरीताई आमोणकर, मोगुबाई कुर्डीकर आणि लता मंगेशकर यांच्या सारख्या दिग्गजांच्या अजरामर कार्यक्रमांची अरुण काकतकर यांनी निर्मिती केली आहे.

अरुण काकतकर यांची आजवर अनेक पुस्तकं प्रकाशित झाली असून “नक्षत्रांचे दिवस” आणि अनुभवसिद्ध अल्पाक्षरी+ दासबोध भासबोध ही पुस्तकं अंधांसाठी ब्रेल लिपीमध्येही प्रकाशित झाली आहेत. इतर पुस्तकं.. ठसे आणि ठोसे, नक्षत्रांचे दिवस, ठोसबोध(९०० ओव्या), ई-बुक्स्.. मनगुंफी, आशयसूत्रे ओविले शब्द (१६०० ओव्या), कॉफी टेबल बुक: जगन्नाथे केले…(जगन्नाथ जाधव CEO, B G SHIRKE GROUP, यांचं आत्मचरित्र), (घ)बाड.. हे पुस्तक छपाईं च्या प्रक्रियेत आहे. अरुण काकतकर यांचे मनगुंफी हे पहिलं ई पुस्तक आहे. आनंद माडगूळकर, नीला सत्यनारायण, विनय हर्डीकर, अशा अनेक नामवंतांनी त्यांचे लिखाण गौरवलेले आहे. सध्या ते पुणे येथे दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत.

२०१६ मध्ये अरुण काकतकर यांना स्वरशब्दप्रभू पुरस्कार मिळाला आहे. तसेच पंडित जितेंद्र अभिषेकी पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला आहे.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..