हायड्रेटिंग फेस पॅक
उन्हाच्या वातावरणात आपली त्वचा नेहमीपेक्षा जास्त तेलकट होते. अशा वेळेस चेह-यावर तजेलदारपणा आणायचा असेल तर आंब्याचा रस घेऊन त्यात मुलतानी माती टाकावी. आंब्याचा रस व मुलतानी माती यांचे उत्तम मिश्रण करून चेह-यावर लावावं. हे मिश्रण चेह-यावर पंधरा मिनिटं ठेवावं. त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावं. चेह-यावर तेज येऊन त्वचा सुंदर दिसते.
संवेदनशील त्वचेसाठी
काही तरुणींची त्वचा अत्यंत संवेदनशील असते, त्यामुळे बाहेरील उन्हाचा, हवेचा व वातावरणाचा त्यांच्या चेह-यावर लगेच फरक जाणवतो. अशा वेळेस आमरसमध्ये तीन चमचे मुलतानी माती घेऊन त्यात २ चमचे पाणी आणि १ चमचा दही टाकून मिश्रण तयार करावे. ही पेस्ट तयार करून चेह-यावर व मानेवर हलक्या हाताने लावावी. हा फेस पॅक चेह-यावर जवळपास तीस मिनिटे ठेवावा. अध्र्या तासानंतर चेहरा सुकल्यावर थंड पाण्याने धुवून टाकावा.
ताजे मँगो फिल्टर
संपूर्ण दिवसभर काम केल्यावर शरीरासोबतच आपला चेहराही थकतो. त्यामुळे चेह-यावर आलेला थकवा घालवण्यासाठी व अकालीन आलेलं वृद्धत्व दूर करण्यासाठी ताज्या मँगो फिल्टरचा वापर करावा. ७-८ अक्रोड किसून त्यात ओटचे जाडे भरडे पीठ २-३ चमचे टाकावे, ३ चमचे मुलतानी माती आणि त्यामध्ये योग्य प्रमाणात पाणी मिसळावे. या सगळ्यांचे योग्य मिश्रण करावे.
तयार झालेले मिश्रण चेह-यावर व मानेवर लावून जवळपास तीन तास तरी सुकवावे. चेहरा पूर्णपणे सुकल्यावर थंड पाण्याने धुवून घ्यावा. जेणेकरून चेह-यावरचा ताण कमी होऊन चेहरा त्राणविरहीत दिसू लागतो. हा उपाय सर्व प्रकारच्या चेह-यासाठी उपयुक्त असून रोज वापर केल्यास चेहरा जास्त खुलून येतो.
मँगो बॉडी स्क्रब
चेह-यासोबतच बाहेरील वातावरणामुळे शरीरावरही परिणाम होतो. आपली त्वचा कोरडी होते तसंच त्वचेतील पेशी मृत पावतात. अशा वेळेस एका भांडयात २ चमचे आंब्याचा रस घ्यावा, त्यात २ चमचे दूध आणि एक चमचा साखर घालून मिश्रण तयार करावं. मिश्रण तयार झाल्यावर ते मिश्रण चेह-यावर व शरीरावर लावून घ्यावं. २० ते २५ मिनिटं शरीरावर मसाज करून कोमट पाण्याने धुवून टाका. साखरेमुळे शरीरावरील मृत पेशी नष्ट होण्यास मदत होते. मृत पेशी नष्ट झाल्यामुळे शरीर व चेहरा टवटवीत दिसतो.
डागविरहीत त्वचेसाठी
आंब्याच्या रसामध्ये हरभ-याचे कूट टाकून त्यात एक चमचा मधाचा टाकावा. हे मिश्रण एकजीव करून घ्यावं. चेह-यावर आणि विशेषत: डाग असलेल्या भागावर हे मिश्रण लावावं. १५ मिनिटांनंतर चेहरा थंड पाण्याने धुवून घ्यावा. हा उपाय रोज केल्यास चेह-यावरील डाग कमी होण्यास मदत होते. चेहरा स्वच्छ होऊन डागविरहीत होतो.
मँगो फेशिअल
चेह-यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी व चेह-याला तेज आणण्यासाठी मँगो फेशिअल नावाचा प्रकार सध्या पार्लरमध्ये प्रचलित आहे. या फेशिअलमध्ये आंब्याच्या रसामध्ये अंडयातील आतील पिवळा द्रवपदार्थ मिसळावा आणि त्यामध्ये मधाचे काही थेंब टाकावेय.
१५ मिनिटांनंतर थंड पाणी व फेस वॉशने चेहरा धुवून घ्यावा. फेस वॉशने चेह-यावर अंडयामुळे आलेली दरुगधी कमी करता येते. साधारण तरुणी महिन्यातून एकदा तरी फेशिअल करतात. त्यामुळे चेह-यावरील सुरकुत्या कमी होतात. मँगो फेशिअलमुळे चेहरा निखळ व तेजस्वी दिसतो.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply