सकाळी WhatsApp च्या एका ग्रूप वर msg आला ….
आपल्या ग्रूप वरील श्री.आमका ढमका यांच्या आज्जी चं दुःखद निधन झाले !
झाल, मग काय …..
‘आज्जी’बात माहित नसलेल्या त्या श्री. अ.ढ.च्या ‘आज्जी’ ला इतर मेंबर कडून भरपूर RIP मिळाले ! इतके की त्या आज्जी ने वाचले असते तर ती उठून म्हणाली असती,
“मला जाळू नका हं ! पूरा मला म्हणजे मी आपली RIP त च बरी !”
तेवढ्यात एका अतीउत्साही मेंबर चा “आज ग्रूप वर कुणीही “विनोद” टाकू नये !” असा मेसेज आला ! बहुदा तो श्री. अ.ढ. कुणीतरी मोठा माणूस असावा ! कारण ग्रूप Admin नी “आज ग्रूप वर कुणीही “विनोद” टाकू नये !” हा मेसेज वाचल्या बरोब्बर मला त्या ग्रूप वरून “Remove” केलं न ……!
Admin ला फोन करून सांगितलं तेंव्हा कळलं की त्या मेंबर ला “विनोद” म्हणजे “जोक” म्हणायचे होते !
मला अजून कळले नाही की, असं काही घडलं की पहिली गदा “विनोदा”वर का पड़ते ?
त्या “यमा” ला विनोदाचे वावडे आहे का ?
रामदास स्वामी का म्हणले असतील “टवाळा आवडे विनोद”
संघाच्या सरसंघचालकांनी विनोद केला ! ही “बातमी” होऊ शकते ?
अरे जगण्याचं साधन आहे “विनोद”
वीनाखर्चीक आनंद/मनोरंजनाचे साधन आहे “विनोद”
ज्याच्या कडे तल्लख “विनोदबुद्धी” असते तो दुःखा पासून बऱ्यापैकी दूर राहू शकतो !
……..आणि म्हणूनच तुम्हाला विनंती की,आयुष्यात निरोगी आणि विनोदी राहायचं असेल तर, “माझ्या टच मधे रहा”
— विनोद डावरे, परभणी….
Leave a Reply