मालती पांडे यांच्या घरात संगीताचे वातावरण होते. त्यांचा जन्म १९ एप्रिल १९३० रोजी झाला.
लहानपणापासूनच गाण्याच्या स्पर्धेत भाग घेणाऱ्या मालती पांडे यांनी त्रिवेदी सर व नाशिकचे भास्करराव घोडके यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे धडे घेतले. किशोरवयातच त्या गाण्याच्या बैठकी करू लागल्या. महाविद्यालयात असताना ”घराबाहेर ”या नाटकातील त्यांच्या भूमिकेचे खूप कौतुक झाले. त्यामुळे प्रभातच्या ”आगे बढो”साठी सुधीर फडके यांनी मालती बाईना बोलावले. ”वेद मंत्राहून आम्हा वंद्य वन्दे मातरम”,”पुढचे पाउल पुढेच टाका”,”त्या तिथे पलीकडे”,हि त्यांची चित्रपटातील गीते खूप गाजली.
मालती बाईनी आपल्या आत्मकथनात लिहिले आहे कि ”त्या तिथे पलीकडे ”हे गीत लतादीदींना इतके आवडले कि एका जाहीर कार्यक्रमात त्यांनी ते गायिले होते. कोलंबिया कंपनीने त्यांची पहिली ध्वनिमुद्रिका काढली.राजा बढे व संजीवनी मराठे यांचे काव्य तर संगीत होते ”गजाननराव वाटवे यांचे.”ये पिकवू अपुले शेत मंजुळे”,”आला स्वप्नांचा मधुमास”अशी ती दोन गीते होती. ”कुणीही पाय नका वाजवू”,”वळणावरून वळली गाडी”ही वाटवे यांनी स्वरबद्ध केलेली तर ”खेड्यामधले घर कौलारू”,”या कातर वेळी ”हि अनिल भारती यांनी लिहिलेली आणि मधुकर पाठक यांनी स्वरबद्ध केलेली मालतीबाईंची गाणी खूप गाजली. आजही त्यांचे ”या कातर वेळी”हे गीत मनाला वेड लावते. मालतीबाईंच्या स्वरातील कातरवेळ अनामिक हुरहूर लावून जाते तर मालती पांडे यांची गाणी आठवायला सुरुवात झाली की लपविलास तू हिरवा चाफा सुगंध त्याचा छपेल का प्रीत लपवुनी लपेल का? हे गाणे अग्रक्रमाने येते. मालती पांडे यांचे गाणे गीताच्या अर्थाला धरून गाणे असे. फार वर्षांपूर्वीच्या दूरदर्शनवरील एका मुलाखतीत गायिका मालती पांडे म्हणाल्या होत्या, ‘प्रीत लपवुनी लपेल का? हा अनुभव तुमचा, माझा, प्रत्येकाचा आहे.
मालती पांडे यांचे २७ डिसेंबर १९९७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply