घरट्यातील पिल्लं तोंड वासून वाट बघतात.
त्या हाका दूर वर असलेल्या पक्ष्यांना ऐकू येतात…
पखांत बळ आणून वेगाने येतात उडत उडत.
इवल्याशा चोंचीत एकेक दाणा राहतात घालत घालत..
मोठी होतात धडपडतात. पडतात उठतात.
आणि पंखात बळ आले की दूर दूर उडत जातात..
घरटं होत ओकबोक. पण हे दोघे असतात आनंदात.
पक्षाला वाटतो अभिमान. कालवाकालव होते मात्र तिच्या काळजात…
कधी साथीने जगतात कधी एकटेच उरतात..
त्यांच्याही पंखातील बळ संपत आहे तरीही ते जगत असतात…..
घरातील मुलंही अशीच आईच्या कुशीत असतात..
बाबाच्या मेहनती वर लहानाचे मोठे होतात..
बळ येते त्यांच्या प्रगतीच्या पंखात.
आत्मविश्वासाने ध्येयाप्रती झेपावतात.
सगळे असूनही म्हणतात आम्ही झालो निराधार..
रानातल्या या पक्षांना कुणाचाही नसतो आधार…
.
माणसं राहतात मोठ्या सुरक्षित आणि सुखसोयीत.
म्हणून हाच फरक आहे फक्त घरात आणि घरट्यात…
सौ कुमुद ढवळेकर
khupach chhan.dhanyawad.9403030939