नवीन लेखन...

फरिश्ता

रात्रभर ड्रायव्हिंग करून थकलेल्या रहिमने आपली टॅक्सी नेहमीच्या जागी पार्क केली. तिच्या महा.xx/०७८६ या नंबर प्लेटच्या खाली बारीक अक्षरातीत ‘फरिश्ता’ या शब्दा कडे पाहून तो समाधानाने हसला. आता रात्री नउ साडेनऊ पर्यंत निवांत होते. रहिम रात्रीच टॅक्सी चालवत असें.

आज पुन्हा ‘पाव भाजी’वरच भागवावे लागणार होते.तो दगडूदादाच्या गाड्याजवळच्या बाकड्यावर विसावला.
“दगडूदादा, एक पाव भाजी दे दे .”

“क्या रहीम, आज पुन्हा पाव भाजी?” दगडूने गरम तव्यावर भाजी साठी बटरचा गोळा सोडत विचारले.
“हा,दादा,आज फार आमदनी कमतीच हुवा!”

“फिर कमीच?आबे,पण असं रोजरोज पावावर भागवून कस जमेल?मरशील उपाशी!”दादा रागावला पण त्याच्या रागावण्यात माया होती.

“अरे,नहीं दादा. पैसा है. कम-ज्यादा चालते रहेगा.दो दिन कमी तो चार दिन ज्यास्ती मिलेगा. पर ये दो दिन का कमाई बेशकिमत था!हा!”

“बेशकिमत?असं काय मिळालं होत काल रात्री?”
“कल?कल रात साडेदस बजेको एक अस्पताल के पास बांद्रा जानेवाला पेसेंजर मिला. हातमे टेथस्कोप था.

मतलब डाक्टर होगा. उसको लेको मै निकलपडा, चार किलोमीटर आया तो शकीलभाय का फोन आया. किधर है पुच्छा. मै बोला पेसेंजर लेको बांद्रा जाताय. तो शकील बोला नक्को जा! मैने पुच्छा क्यू? तो बोला अब्भी एक ट्रॅव्हल बस रस्त्याने पल्टी हुयेला है! लोंगा बोंबा मारलेले है! चिल्लाले है! सब खून खराबा हुयेला है! कितनी खोपडीयोका ढक्कन खुलेले पता नाही! खाली पिली ट्रॅफिकमे फसेगा! मैने फोन कट किया. मिररमे देखा तो डाक्टर आखे मुंद के बैठेला था. क्या खुदाका रहेम देख,दादा,डाक्टर साथमे मेरे,और मौतसे झुंजते लोंगा भी मेरे सामने! झटसे मैने गाडी पल्टी वाले स्पॉट पे लाया! टॉप गेअरमे! डाक्टरका आख खुला तो वो साला हक्का -बक्का देखता रहा ! फिर झटकेसे गाडीसे खुदा और जख्मयकि मदतमे जूट गया! नेक बंदा! तब तक तो ट्रॅफिक जमने लगी. मेरे पिछले गाडीवाले हॉर्न पे बोंबा मारने लगे थे! मै फिर वहासे खिसेका!”

“अन तुझं भाड?” दगडूदादाने विचारले.
“भाडा?दादा, ओ डाक्टर फरिश्ता बनको लोगोंको बचाता और मै दो चार सो के वास्ते उसको टोकू?ना. मुझे मेरा भाडा मिलगया!”

“तू पक्का पागल आहेस!अन आज रात्री काय तिर मारलस ?”
“रातमे करीब बारा बजे अपना ‘ओला ‘वाला रामू मिला. उस्का गाडी फेल था और एअरपोर्टवाला भाडा बुक था. रामू बोला,बारा बीस का पीकप टाइम है. पेसेंजर फोनपे नही मिलेला. मेसेज भेजा पर मिलता नही मिलता पता नही! तो बोला तू जाता? मैने सोचा साला ये टाईमको ओ पेसेंजरको दुसरा टॅक्सिभी नही मिलेगा. मै बराबर बाराबीस को उस्को लेको एअरपोर्ट निकला.रास्तेमे पेसेंजरने उस्का मोबाई चार्जिंगके वास्ते मेरी तरफ दिया. और पिछली सीटपे सो गया. थका होगा. मैने मोबाईल चार्जरको लटका दिया. दो चार बार रिंग बजा,मैने ‘सरजी, सरजी’ आवाज दि पर उसने आख नाही खोली. गहिरी निंद मे था शायद. बीचमे स्ट्रीट लाईट बंद हुवी. बारिशभी शुरु हुवी थी. उसकी आख खुली. उसने पुछा हम कहा है?और वखत पर पोहूंचेगे ना ?मैने कहा पहुच जायेंगे! ओ फ़िरसे सो गया. गियर बदलनेकी झंझटमे उस्का मोबाईल चार्जरसे अलग हुवा. मैने फिर लगाने लागा तो मेरे टच से स्क्रीन चमक उठा. उस पे मेसेज था -rushing to Apollo Hospital ! AnjlikakuSerious !!.साला इसाकि कोई तो सगेवाली बीवी,माँ, बहन, बेटी अस्पताल जायेली है!इस्को तो हवाईअड्डे से अस्पताल होना चाहिये! फिर मैने ‘सरजी ‘पुकारा ,तो ये खर्राटे लगालेला था!मैने झटकेसे यु टर्न मारा और अपोलो पोहचा. मै गाडी पार्क करने जा रहा तो एक ऍम्ब्युलन्स मेरेकु कट मारके इमर्जन्सी गेट पर रुका. मैने तगडा ब्रेक मारा. ओ झटकेसे पेसेंजर चिल्लाया आबे तेंकू एअरपोर्ट बोला तू इधर किधर लाया! उतनेमे उस्का नजर ऍम्ब्युलन्स वाले पेशंट पर गया. क्या हुवा पता नाही. घाबरके ओ ‘अंजली ‘,’अंजली ‘ चिल्लाते पेशंटके साथ अस्पतालमे घूस गया! कबतक मै उधर रूकता?उस्का बॅग सेक्युरिटी को थमाके मै लिकल गया. इस्का भी भाडा छोडना पडा! पर वांदा नही! मैने मेरे पेसेंजर को वही छोडा जहाँ उसे होना चाहिये था! नेक काम का सुकून मिला! बोल,दादा, ये ‘सुकून’वाली कमाई क्या कम है?”

” कशाला नसत्या भानगडीत पडतोस? एक सांगू रहीम,तू हि टॅक्सी विकून टाक! हि घेतल्या पासून तुझी कमाई घटत चाललीय! अन तुझ्या रोजच्या ‘पाव-भाजी’ ने माझी वाढत चालली आहे.!”

“ना दादा!ना!तुझे पता है, मै हजार पांच सो के लिये द्न्गो मे मारपीट किया करता था!मकान- दुकान -बस -झोपडीया जलाया करताथा! बहुत बिगडेला था तब! मेरे हाथ से कयी गंदे काम हुए है! उस रोज मैने बस जलाई थी जीसमे एक बुजुर्ग जला था. ओ मेरा अब्बु था! कल मैने डाक्टर को पल्टी गाडी के पास छोडा तो , मैने किसी के अब्बु कि जान बचाई ऐसे मुझे लगा! मेरी सकिना जब अस्पताल मे दम तोड रही थी तभ मै बम्बई के सडकोपें था! नही जा पाया उसकी उसकी जरुरत के वखत! कल जब ओ बाबू ‘अंजली,अंजली ‘ करते दौडा तो मुझे सुकून मिला! ये ‘फरिश्ता’ टॅक्सी मुझसे भले काम करवाती है! मेरे पाप धुलवती है! ना! दादा! ना! मै ये टॅक्सी कभी ना बेचुंगा!!” रहीम पोट तिडकीने सांगत होता. पण दगडू दादा दुसऱ्या गिराहीका साठी भाजी घोटत होता. रहीम काय म्हणतोय हे त्याने ऐकलेच नाही.

—  सु र कुलकर्णी.
आपल्या प्रतिक्रियांची वाट पहातोय.पुन्हा भेटूच. Bye.

Avatar
About सुरेश कुलकर्णी 176 Articles
मी सुरेश कुलकर्णी. . साधारण कथा , लेख ,जुन्या सिनेमाच्या (हिंदी )गण्यावर माझे लिखाण असते . एखादे छानसे पुस्तक वाचण्यात आले तर त्यावर हि लिहतो . माझ्या वाचकास एक नम्र विनंती माझे लिखाण आवडले तरी ,आणि नाही आवडले तरी जरूर कळवा माझ्या लिखाणाचा पोत त्या शिवाय सुधारणार नाही .माझे सर्व लिखाण काल्पनिक असते .. mb.6361255994. किवा srk101252@gmail --संपर्का साठी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..