फॅशन डिझायनर, दिग्दर्शक विक्रम फडणीस यांचा जन्म २३ ऑक्टोबर रोजी झाला.
फॅशनच्या वलयांकित जगतात आपले नाव कोरणारा मराठमोळा फॅशन डिझायनर विक्रम फडणीस यांचे आई वडील दोघेही डॉक्टर. त्यामुळे साहजिकच डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होणार अशी अपेक्षा होती. कॉलेजला असतानाच त्यांना फॅशन कोरिओग्राफीची आवड निंर्माण झाली होती. त्यानंतर त्यांनी आपल्या घरातल्या एका कार्यक्रमासाठी कपडे डिझाईन केले जे सगळ्यांना आवडले आणि मग त्यांना कॉन्फिडन्स आला की आपल्याला यातलं कळतं. विक्रम यांनी कॉलेज मध्ये असताना काही शोजसाठी ही काम केलं. त्यांचे काम बघून प्रसिद्ध मॉडेल मेहेर जेसिया यांनी तू फिल्मसाठी काम का करत नाहीस? त्यानंतर विक्रम यांना ब्रेक मिळाला तो मोठय़ा चित्रपटात. विक्रम यांची पहिली फिल्म होती कमल हसन यांचा हिंदुस्तानी, यात विक्रम यांनी उर्मिला मातोंडकरचे कॉस्च्युम्स डिझाईन केले होते.
मग एकापाठोपाठ चित्रपट मिळण्यास सुरूवात झाली आणि खूप लहान अवधीतच विक्रम यांचे फॅशन कोरिओग्राफर म्हणून नाव झालं. त्यांनी सलमान खान, शाहरुख खान, अक्षय कुमार या टॉपच्या हिरोंचे कपडे डिझाईन केले आहे. सलमान खानचे कपडे त्यांनी सतरा वर्ष केले आहेत.. सलमान खान चे बीवी नंबर वन, सलामे इष्क, दुल्हन हम ले जायेंगे, ऐतराज, तेरे नाम, हसीना मान जायेगी हे चित्रपट, तर अक्षय कुमारचे रावडी राठोड, वक्त, नमस्ते लंड़न असे अनेक चित्रपट केले.
दिग्दर्शक म्हणून करीयर करायचं हे विक्रम फडणीस यांनी आधीपासूनच ठरवलं होतं, मात्र त्यांच्या करीयरची सुरुवात फॅशन डिझायनर म्हणून झाली. एका फॅशन डिझायनरबरोबर काम करता करता त्यांनी फॅशन जगतात दिग्दर्शक म्हणून काम करू लागलो. तेव्हाच २००३-२००४ साली त्यांनी चित्रपटाची कथा लिहिली होती. आतापर्यंत ३ कथा लिहिल्या. हृदयांतर हा त्यांचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटात अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री मुक्ता बर्वे मुख्य भूमिका केली होती. हृदयांतर चित्रपटा बद्दल विक्रम फडणीस सांगतात की, ‘हृदयांतर’ची कथा हिंदीत लिहिली होती. माझ्या आयुष्यात आलेली कोणतीही संधी मी कधीही नाकारली नाही. तसंच या सिनेमाच्या बाबतीत घडून आलं. हिंदीत लिहिलेली कथा मराठीत सादर करण्याची संधी मिळाली तेव्हा मनात विचार आला की, मी स्वतः महाराष्ट्रीयन आहे आणि आज मराठी सिनेमा इतका मोठा झालाय की, जे महाराष्ट्रीयन नाहीत तेही मराठी सिनेमा चित्रपटगृहात जाऊन बघतात तर हिंदीतल्या कथेचं मराठी चित्रपटात सादरीकरण करायला काय हरकत आहे?
पुढे विक्रम फडणीस यांनी ‘स्माईल प्लिज’ या मराठी चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply