भीतीपोटी सारे करतां
असेच वाटते….।।धृ।।
विवेकानें विचार करा, तुम्हांस हे पटते
त्रिकाळ चाले पूजा अर्चा
प्रभूविषयी होई चर्चा
बालपणींच पडे संस्कार
सारे देण्या समर्थ ईश्वर
कृपे वाचूनी त्याच्या, तुम्हां सुख दुरावते….१
भीतीपोटी सारे करता, असेच वाटते,
चूक असे हे ठसें मनाचे
कर्म ठरवीं तुम्हींच तुमचे
सहभाग नसे यात प्रभूचा
सारा खेळ असे तो मनाचा
अपयश मिळेल म्हणून टाकी, भार ईश्वरावरते…..२
भीतीपोटी सारे करता असेच वाटते
ऐषआरामाचे आम्ही पाठीं
धडपड चाले सुखासाठी
साशंक सदा मन असते
म्हणून सारे वंचित होते
मिळवण्यासाठीच त्याला भजावे, ही भावना मनी येते….३
भीतीपोटी सारे करता असेच वाटते
वाद नसे ईश्वर शक्तीचा
चालवी सतत गाडा विश्वाचा
खेळ बघे तो दूर राहूनी
सारे देई तुम्हावरती सोपवूनी
परि मन वेड्या आशेने, त्याजकडे धावते…४
भीतीपोटी सारे करता, असेच वाटते
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply