१४ फेब्रुवारी : सहाव्या विश्वचषकाची सुरुवात व विश्वचषकातिल सलामिच्या लढतिंचा गोषवारा१४ फेब्रुवारी १९९६ रोजी सहाव्या पुरुष क्रिकेट विश्वचषकाचा प्रारम्भ झाला. सलामिची लढत झाली इंग्लंड आणी न्युझिलंड या दोन संघांदरम्यान अहमदाबादमधिल सरदार पटेल गुजरात स्टेडिअमवर (मोटेरा).इंग्लिश कर्णधार माइक आथर्टनने नाणेकौल जिंकुन गोलंदाजी स्विकारली. निर्धारित पन्नास षटकांमध्ये किविंच्या संघाने ६ बाद
२३९ धावा काढल्या. उत्तरादाखल इंग्लंडचा कप्तानच अवघी एक धाव काढुन आणी संघाचिही एकच धाव झालेली असताना बाद झाला. त्यानंतर अॅलेक स्टेवर्ट आणी ग्रॅएम हिक यांनी ९९ धावांची भागिदारी करित इंग्लंडला मजबुत पायाभरणी करुन दिली. त्यानंतर निल फेअरब्रदरनेही चांगले प्रयत्न केले पण अखेर ११ धावांनी इंग्लंडचा पराभव झाला.आजवरच्या विश्वचषकांमधील सलामिच्या लढती
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply