१७ फेब्रुवारी १९८२ रोजी कोलम्बोच्या पी सरावनमुत्तू मैदानावर इंग्लंडविरुद्ध कसोटी खेळण्यास आरम्भ करुन श्रिलंका हे कसोटिदर्जा मिळविणारे आठवे राष्ट्र बनले.
बंदुला वर्णपुरा या सामन्यात श्रिलंकेचा कप्तान होता तर महेस गुणतिल्लके हा यष्टिरक्षक. प्रवासी इंग्लंड संघाचा कर्णधार होता किथ फ्लेचर तर यष्टिरक्षक होता बॉब टेलर.
जेफ कुक या इंग्लिश खेळाडुची ही पदार्पणाची कसोटी होती तर श्रिलंकेकडून कर्णधार व यष्टिरक्षक वगळता इतर नऊ गडी होते : सिदाथ वेट्टिमुनी, रॉय डायस, दुलिप मेंडिस, रंजन मदुगले, अर्जुन रणतुंगा, सोमचंद्र डिसिल्वा, अशांथा डिमेल, ललित कालुपेरुमा आणी अजित डिसिल्वा.
सामन्याचा पहिला डावश्रिलंका ८१.५ षटकांमध्ये सर्वबाद २१८ (रंजन मदुगले ६५, अर्जुन रणतुंगा ५४). डेरेक अंडरवूड १८-६-२८-५. इअन बोथम १२.५-१-२८-३.सामन्याचा दुसरा डावइंग्लंड ८६.५ षटकांमध्ये सर्वबाद २२३ (डेविड गॉवर ८९, किथ फ्लेचर ४५). अशांथा डिमेल १७-२-७०-४. सोमचंद्र डिसिल्वा २७.५-११-५४-३.इंग्लंडला पाच धावांची आघाडी.सामन्याचा तिसरा डावश्रिलंका ८३.५ षटकांमध्ये सर्वबाद १७५ (रॉय डायस ७७, वर्णपुरा ३७). जॉन एम्बुरी २५-९-३३-६. डेरेक अंडरवुड ३७.५-१५-६७-३.श्रिलंकेला १७० धावांची आघाडी.सामन्याचा चौथा डावइंग्लंड (विजयासाठी लक्ष्य १७१ धावा) ५८.१ षटकांमध्ये ३ बाद १७१ (क्रिस टॅवेर ८५, गॉवर नाबाद ४२). अजित डिसिल्वा १७-६-४६-२.
बांग्लादेशाविरुद्ध १२ कसोट्या, १२ विजय. झिम्बाब्वेविरुद्ध १५ कसोट्या, १० विजय, ५ अनिर्णित. पाकिस्तानविरुद्ध ३७ कसोट्या, ९ विजय, १५ पराभव, १३ अनिर्णित. न्युझिलंडविरुद्ध २६ कसोट्या, ७ विजय, ९ पराभव, १० अनिर्णित. इंग्लंडविरुद्ध २१ कसोट्या, ६ विजय, ८ पराभव, ७ अनिर्णित. भारताविरुद्ध ३५ कसोट्या, ६ विजय, १४ पराभव, १५ अनिर्णित. वेस्ट इंडिजविरुद्ध १५ कसोट्या, ६ विजय, ३ पराभव, ६ अनिर्णित. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १७ कसोट्या, ४ विजय, ८ पराभव, ५
अनिर्णित. ऑस्ट्रेलियाविरुद्ध २० कसोट्या, १ विजय, १३ पराभव, ६ अनिर्णित.
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply