केनियाचे पदार्पण
केनियाचा संघ : दिपक चुडासामा, केनेडी ओटिएनो (यष्टिरक्षक), स्टिव टिकोलो, मॉरिस ओडुम्बे (कर्णधार), हितेश मोदी, टॉमस ओडोयो, टिटो ओडुम्बे, असिफ करिम, डेविड टिकोलो, मार्टिन सुजी, रजब अली.
मोहम्मद अजहरुद्दिनने नाणेकौल जिंकुन गोलंदाजी स्विकारली आणी केनियाच्या फलंदाजांनी त्यांच्या देशातिल खेळाचा दर्जा वरिष्ठ पातळिवरिल क्रिकेतसाठी योग्यच असल्याचे दाखवुन दिले. केनियाच्या डावात स्टिव टिकोलोने लक्षवेधक खेळ केला. त्याने ८३ चेंडुंवर एक षटकार आणी चार चौकारांसह ६५ धावा काढल्या आणी कर्णधार मॉरिस ओडुम्बेसहित ९६ धावा जोडल्या. मधल्या फळिने त्याच्या पतनानंतर फिरकिपटुंना चोपण्याचा प्रयत्न केला आणी अनिल कुम्बळेसारखे खेळाडू समोर असल्याने तो फसला.
भारताला विजयासाठी अवघ्या २०० धावा हव्या होत्या. सलामिविर अजय जडेजा आणी सचिन तेंडुलकरने २० षटकांमध्येच १०० धावा जमविल्या आणी १६३ धावा जमविल्यानंतर त्यांची जोडी फुटली. विश्वचषकाच्या सामन्यांमध्ये भारताकडुन कोणत्याही जोडिसाठी हा विक्रम होता. तेहतिसाव्या षटकात जडेजा बाद झाला तेव्हा तेंडुलकर ९८ धावांवर खेळत होता. ९९ धावांवर नऊ चेंडू खेळुन काढल्यानंतर अखेर त्याने एकदिवसिय सामन्यांमधिल आपले पाचवे शतक झळकावले.
तेंडुलकरच्या क्षणिक ‘थाम्ब्याचा’ परिणाम बहुधा त्याच्या सहकारी फलंदाजांवर झाला आणी सिद्धू व काम्बळी जम बसण्यापुर्विच बाद झाले. शतकानंतर मात्र तेंडुलकर पुन्हा वेगाने धावा जमवू लागला. अखेर १३४ चेंडुंमध्ये (१५ चौकार, १ षटकार) १२७ धावांवर तो नाबाद राहिला. नयन मोंगियाने विजयी चौकार मारला. मोहम्मद अजहरुद्दिनचा हा २०० वा एदिसा होता.<निल स्मिथची उलटी
एक स्नायू या सामन्यात दुखावला (त्याने व्हाइटला स्पर्धेबाहेर काढले). व्हाइटची बेबी ओवर तिन चेंडू टाकुन स्मिथने पुर्ण केली. सामनाविर ठरलेल्या इंग्लंडच्या निल स्मिथलाही फलंदाजिदरम्यान निवृत्त व्हावे लागले. या सामन्यात त्याला सलामिला पाठवण्यात आले होते आणी पोटात खळबळ उडावी असे काही त्याच्या खेळात दिसले नव्हते. ३१ चेंडुंमध्ये २७ धावा त्याने काढलेल्या होत्या. डावाच्या तेराव्या षटकात त्याने मैदानावर उलटी केली आणी मग डाव सोडला…
ग्रॅहम थॉर्पने (नाबाद ४४) मग निल फेअरब्रदरच्या साथित इंग्लंडचा विजय साकार केला.
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply