नवीन लेखन...

फेब्रुवारी २२ : १९९२ – विश्वचषकाचा खळबळजनक प्रारम्भ : किवी-कांगारू झुंज आणी सचिन-बोथम आमनेसामने !

 

ऑस्ट्रेलिया-न्युझिलंडने यजमानपद सांभाळलेल्या पाचव्या विश्वचषकाची सुरुवात २२ फेब्रुवारी १९९२ रोजी ऑकलंडमधिल गतविजेती ऑस्ट्रेलिया आणी न्युझिलंड या संघांदरम्यानच्या लढतिने झाली. न्युझिलंडचा कर्णधार असलेल्या मार्टिन क्रोने नाणेकौल जिंकला आणी फलंदाजी स्विकारली.
क्रेग मॅक्डरमॉट पहिले षटक घेउन आला. त्याने टाकलेले पहिले दोन चेंडू वाइड होते ! तिसरा चेंडू वाइड नव्हता आणी तो जॉन राइटच्या यष्ट्या उद्ध्वस्त करुन गेला …. काय सुरवात होती कांगारुंसाठी !

१ बाद २, २ बाद १३, ३ बाद ५३ अशी डळमळित सुरवात किविंनी केली पण अखेर क्रो आणी केन रुदरफोर्ड यांनी चौथ्या गड्यासाठी २५ षटकांमध्ये ११८ धावा जोडल्या व किविंचा डाव सावरला. त्यानंतर क्रिस हॅरिस, यष्टिरक्षक इअन स्मिथ व क्रिस केर्न्स यांच्या साथित मार्टिन क्रोने आपला एकाकी लढा सुरुच ठेवला. निर्धारित ५० षटकांमध्ये ६ बाद २४८ धावा किविंनी उभारल्या. मार्टिन क्रो (गुडघा दुखावलेला असतानाही) नेमक्या १०० धावा काढुन नाबाद राहिला.

१९८७ चा विश्वचषक अ‍ॅलन बॉर्डरच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियन संघाने जिंकला होता आणी १९९२ चा विश्वचषक त्यांच्या घरात होत असल्याने ऑस्ट्रेलियाचा विजय बर्‍याच जणांनी गृहित धरलेला होता. डेविड बुन आणी जेफ मार्श यांनी ६२ धावांची तडाखेबंद सलामी झाडली आणी ऑस्ट्रेलिया वेगाने विजय जवळ करू लागली.

क्रिस केर्न्सला या सामन्यात डॅनी मॉरिसनच्या जागी स्थान मिळाले होते आणी त्याच्याकडे बघुन तोंड वाकडे करणारे अनेक नागरिक त्यावेळी न्युझिलंडमध्ये होते पण धावा रोखणारी गोलंदाजी करित केर्न्सने आपली उपयुक्तता सिद्ध केली. मार्टिन क्रोने अत्यंत धुर्तपणे दिपक पटेल या ऑफ-स्पिनरला नवा चेंडू सोपवला आणी ही चाल कमालिची यशस्वी ठरली. बुन आणी मार्शसारखे फलंदाज पटेलच्या पहिल्या सात षटकांमधुन अवघ्या १९ धावाच घेऊ शकले !

सततच्या गोलंदाजितिल

बदलांमुळे कांगारू कायम दडपणाखाली राहिले आणी डेविड बुन मार्टिन क्रोप्रमाणेच एका बाजुने उभा राहिला पण आवश्यक धावगती दहाच्याही वर चढू लागल्यावर तो वेगाने धावा जमविण्याचा प्रयत्न करू लागला. अखेरच्या पाच षटकांमध्ये कांगारुंना ५० धावा विजयासाठी हव्या होत्या. नेमक्या १०० धावा काढुन अखेर बुन धावबाद झाला. त्यावेळी कांगारुंच्या नेमक्या २०० धावा झालेल्या होत्या. अखेरच्या पाच जणांना केवळ ११ धावाच काढता आल्या आणी गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचा सलामिच्या सामन्यातच पराभव अशी खळबळजनक सुरुवात जगाने अनुभवली. मार्टिन क्रो या स्पर्धेचा अखेर मालिकाविर ठरला.

<बोथमची कमाल
२३७ धावांचे आव्हान भारतासाठी जड असण्याचे काहिच कारण नव्हते. रवी शास्त्री, श्रिकांत, अझरुद्दिन, तेंडुलकर, काम्बळी, प्रविण आमरे, कपिल देव, सुब्रतो बॅनर्जी, किरण मोरे, दहाव्या क्रमांकावर मनोज प्रभाकर आणी अकरावा जवागल श्रिनाथ हा भारताचा जबरदस्त संघ ! प्रत्येकाकडे वेगाने धावा जमविण्याची क्षमता होती. तरिही इंग्रजांनी भारताला झुंजवले – इअन बोथमसारखा हिरा त्यांच्या संघात होता. कंजुषिची सिमारेषा पार करत बोथमने या सामन्यात आपल्या १० षटकांमधुन अवघ्या २७ धावा दिल्या होत्या आणी सचिन तेंडुलकरला ३५ धावांवर तर विनोद काम्बळिला अवघ्या ३ धावांवर गार केले होते ! डेरेक प्रिंगलचा एक चेंडु बॅनर्जिने प्रेक्षकांमध्ये भिरकावुन दिला (वाकाची सिमारेषा जगातिल मोठ्या सिमारेषांपैकी एक आहे – जवळजवळ ९० यार्डएवढी !) तेव्हा एक षटक बाकी होते आणी भारताला विजयासाठी ११ धावांची गरज होती. अखेरच्या षटकातिल दुसर्‍या चेंडुवर श्रिनाथ धावबाद झाला – क्षेत्ररक्षक इअन बोथम ! इंग्लंडने अवघ्या नऊ धावांनी हा सामना जिंकला. रवी शास्त्री, प्रविण आमरे, किरण मोरे आणी श्रिनाथ ही धावबादांची लांबलचक यादी.

सामनाविर इअन बोथम. इंग्लंडने एदिसांमध्ये मिळवलेला हा सलग सातवा विजय होता. आणखी चार सामने इंग्लंडने सलग जिंकले आणी पुढचा सामना ते हरले – दुर्दैवाने तो स्पर्धेचा अंतिम सामना होता ! (पाकिस्तानकडुन पराभव)

— डॉ. आनंद बोबडे

Avatar
About डॉ. आनंद बोबडे 232 Articles
सोलापूर येथील डॉ. वैशम्पायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस. क्रिकेटमधील विक्रम, मराठी-इंग्रजी शब्दकोडी, साहित्य व साहित्यिकांवरील लेख, महफिल-ए-ग़ज़ल हे सदर सोलापरच्या दैनिक संचार मध्ये गाजले. "जागत्या स्वप्नाचा प्रवास - सचिन तेंडुलकर १९८९ ते २०१०..." हे सचिनच्या कामगिरीचा सर्वांगीण आढावा घेणारे पुस्तक (पूजा प्रकाशन, ठाणे).

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..