महिलांच्या आंतरराष्ट्रिय क्रिकेटला अजुनही फारशी प्रसिद्धी मिळत नाही ही खेदाची गोष्ट आहे. पुरुषी पगडा एवढा जबरदस्त आहे की विविध माध्यमांमधुन क्रिकेटच्या विक्रमांना प्रसिद्धी देताना त्यांमध्ये महिलांच्या सामन्यांचा विचार केलेला नाही अशी टिपही देण्याचे सौजन्य कुणी दाखवित नाही. (माझ्या आतापर्यंतच्या अनवधानाने मिही या गटात सामिल आहे !)
महिलांचा एकदिवसिय विश्वचषक पुरुषांआधी झाला होता (१९७३ मध्ये). मुळात महिलांच्या आंतरराष्ट्रिय एदिसांची सुरुवातच त्या विश्वचषकापासुन झाली. या पुरुषी वर्चस्वाबद्दल पुन्हा कधितरी…
एकाच कसोटी सामन्यात किमान दहा गडी बाद करणे आणी शतकही काढणे (एका डावातच) ही कामगिरी कुणाही पुरुषाला जमण्याआधी एका महिला खेळाडुने केलेली आहे ! ‘लेडी डॉन’ (किंवा ‘फिमेल ब्रॅडमन’) या टोपणनावाने ओळखली जाणारी ऑस्ट्रेलियाची बेटी विल्सन (एलिझबेथ रिबेका विल्सन) ही ती खेळाडू. २१ फेब्रुवारिला (१९५८) इंग्लंड महिला वि. ऑस्ट्रेलिया महिला यांच्यातिल कसोटी सामना मेलबर्नमधिल सेंट किल्डा क्रिकेट क्लब ग्राउंडवर सुरू झाला होता…
ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव अवघ्या ३८ धावांमध्ये संपुष्टात आला. बेटी विल्सनच्या १२ धावा डावात सर्वाधिक ठरल्या. ही अर्ध्याच आश्चर्याची गोष्ट होती कारण दोन्ही संघांचा एक-एक डाव जेव्हा पुर्ण झाला तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या संघाकडे तब्बल ३ धावांची आघाडी होती ! कप्तान मेरी डुगनच्या १२ धावा इंग्लंडच्या डावात सर्वोच्च ठरल्या. बेटी विल्सनने या डावात साडेदहा षटके गोलंदाजी करताना ७ धावा देत तब्बल ७ फलंदाजांना परतिचा रस्ता दाखवला होता. या सात बळिंमध्ये एका त्रिक्रमाचा समावेश होता. महिलांच्या कसोट्यांमधिल हा पहिलाच त्रिक्रम ! वैयक्तिक अकराव्या षटकाच्या पहिल्या ३ चेंडुंवर बेटिने तिघिंना बाद केलेले होते : एडन
ा बार्कर (त्रिफळाचित), जोअन हॅवेस (यष्टिचित) आणी डोरोथी मॅकफर्लेन (पायचित).
ा बार्कर (त्रिफळाचित), जोअन हॅवेस (यष्टिचित) आणी डोरोथी मॅकफर्लेन (पायचित).
दिवस-अखेर ऑस्ट्रेलियाने दुसर्या डावात ४ बाद ६६ धावा केलेल्या होत्या. बेटी विल्सन नबाद २७ आणी वॅल्मा बॅटी नबाद
१०.
हे सगळे नाट्य घडले २२ फेब्रुवारिला. पावसामुळे
पहिल्या दिवशी खेळ होऊ शकला नव्हता. २३ फे हा विश्रांतिचा दिवस होता. २४ फेला बेटी विल्सनने शतक पुर्ण केले आणी लगेचच ती बाद झाली. तेव्हा संघाचा स्कोअर होता ७ बाद १७६. (१०० धावा एकट्या बेटिच्या !) ९ बाद २०२ धावांवर ऑस्ट्रेलियाने डाव घोषित केला. दिवसाच्या निर्धारित वेळेत इंग्लिश महिला ८ बाद ७६ धावाच करू शकल्या व सामना अनिर्णित राहिला. दुसर्या डावात बेटी विल्सनच्या गोलंदाजिचे पृथक्करण होते : १९-१४-९-४.
सामन्याच्या दोन्ही डावांमध्ये मिळुन ११ बळी बेटी विल्सनने मिळवले होते आणी दुसर्या डावात शतकही झळकावले होते. कसोट्यांच्या तोवरच्या इतिहासात कुणालाही अशी दुहेरी कामगिरी जमलेली नव्हती.
२१ नोव्हेम्बर १९२१ रोजी जन्मलेल्या बेटिने वयाच्या सव्विसाव्या वर्षी कसोटिपदार्पण केले होते. विवाहित स्त्रियांनी क्रिकेटसारख्या खेळात सहभागी होणे त्या काळच्या समाजाला मान्य नसल्याने बेटिने लग्नाचा एक प्रस्ताव धुडकावुन लावला होता. “ऑस्ट्रेलियाकडुन क्रिकेट खेळणे आणी विवाह या पर्यायांमध्ये कुणी विवाहाची निवड करेलच कशाला ?” असा तिचा सवाल होता.
१९५१ मध्ये तिने इंग्लंडचा दौरा केला. दौर्यापुर्वी आणखी एक विवाह-प्रस्ताव तिने धुडकावला होता. क्रिकेटबाबत ती फारच दक्ष होती. त्या काळात ऑस्ट्रेलियाच्या महिला आठवड्यातुन एकदा सराव करित असत, बेटी मात्र रोजच्या रोज सराव करित असे. २००८ मध्ये प्रसिद्ध झालेल्या तिच्या एका मुलाखतित तिने सांगितले होते : “इंग्लंडला आमच्या ३८ धावांची बरोबरी करण्यासाठी ३ धावा हव्या होत्या आणी
३ विकेट्स शिल्लक होत्या. त्यांना त्या ३ धावा मिळू द्यायच्या नाहित असा माझा निश्चय होता. शेवटच्या ३ फलंदाजांना मी बाद केले. डाव सम्पला आणी ड्रेसिंग रुमकडे जाता-जाता कुणितरी मला सांगितले, ‘बेटी, तू हॅट्रिक घेतलीस !’ मला रडुच कोसळले…” याच मुलाखतित तिने आज आधुनिक युगात महिला क्रिकेट लोकप्रिय न होण्याचे एक मोठे कारण “आता चमकदार खेळ करणार्या खेळाडू राहिलेल्या नाहित” असे सांगितले होते.
३ विकेट्स शिल्लक होत्या. त्यांना त्या ३ धावा मिळू द्यायच्या नाहित असा माझा निश्चय होता. शेवटच्या ३ फलंदाजांना मी बाद केले. डाव सम्पला आणी ड्रेसिंग रुमकडे जाता-जाता कुणितरी मला सांगितले, ‘बेटी, तू हॅट्रिक घेतलीस !’ मला रडुच कोसळले…” याच मुलाखतित तिने आज आधुनिक युगात महिला क्रिकेट लोकप्रिय न होण्याचे एक मोठे कारण “आता चमकदार खेळ करणार्या खेळाडू राहिलेल्या नाहित” असे सांगितले होते.
२२ जानेवारी २०१० रोजी तिने जगाचा निरोप घेतला.
कारकिर्द: ११ कसोट्या, १६ डाव, १ नाबाद, ८६२ धावा, १२७ सर्वोच्च, सरासरी ५७.४६, ३ शतके, ३ अर्धशतके, १० झेल.
गोलंदाजी : २१ डाव, २८८५ चेंडू, ८०३ धावा, ६८ बळी, ७-७ डावात सर्वोत्तम, ११-१६ सामन्यात सर्वोत्तम, प्रतिबळी ११.८० धावा, प्रतिषटक १.६७ धावा, प्रतिबळी ४२.४ चेंडू (अर्थात दर आठव्या षटकात बळी).
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply