१९४३
सर्वात लहान वयात एदिसा पदार्पण करणारी महिला आहे पाकिस्तानची सज्जिदा शाह (तेराव्या वर्षाच्या १७१ व्या दिवशी).
सर्वात लहान वयात कसोटिपदार्पण करणारी महिला आहे सज्जिदा शाहच (एदिसापदार्पणानंतर ७ दिवसांच्या अंतराने).
सर्वात लहान वयात कसोटिपदार्पण करणारा पुरुष आहे पाकिस्तानचाच हसन रझा (पंधराव्या वर्षाच्या २२७ व्या दिवशी).
सर्वात लहान वयात एदिसा पदार्पण करणारा पुरुष आहे हसन रझाच (कसोटिपदार्पणानंतर पाच दिवसांच्या अंतराने).अलिमुद्दिनच्या उपरोल्लेखित पराक्रमानंतर बारा वर्षांच्या अवकाशाने कराचिच्या नॅश्नल स्टेडिअमवर पहिलीवहिली कसोटी खेळली गेली. भिडू होते भारत व पाकिस्तान. १२ वर्षांत पुलाखालुन बरेच
(डोळ्यांतिल) पाणी, रक्त आणी
माणुसकिचे गहिवर सांडलेले होते आणी अलिमुद्दिन आता पाकिस्तानी संघाचा सलामिविर होता !
पहिल्या डावात अवघ्या ७ धावाच तो काढू शकला. १६२ धावांवर पाकिस्तानचा डाव सम्पुनही १७ धावांचा पुढावा त्यांना मिळाला. खान मोहम्मद व फजल महमुद यांनी प्रत्येकी पाच गडी बाद केले. त्रेसष्ट बाजुबदलांच्या खेळात पाककडुन तिघांनीच गोलंदाजी केलेली होती : तिसरा होता मेहमुद हुसेन.
दुसर्या डावात अलिमुद्दिनने नाबाद शतक काढले. १५ चौकारांसह १०३ धावा. कर्णधार अब्दुल करदारचे शतक सात धावांनी हुकले. सामना अनिर्णित राहिला. प्रकाश भंडारी व जेसू पटेल यांची ही पदार्पणाची कसोटी होती.
अलिमुद्दिनचे दुसरे कसोटी शतकही याच मैदानावर आले. पाकिस्तान इंटरनॅश्नल एअरलाइन्समध्ये काम करित पुढे तो लंडनमध्ये स्थायिक झाला.
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply