थीम बेकर व सेबॅस्टियन स्टॅलोफन हे दोघे २४-२५ वर्षीय तरुण. २००६ मध्ये या दोघांना एक भन्नाट कल्पना सुचली. अविश्वसनीय वाटतील अशा करमती व थक्क करणारे व्हिडिओ दाखवणारी एक चित्रफीत त्यांनी तयार केली.
“पेशन्स प्रॉडक्शन्स” नावाच्या बॅनरने ही आगळी चित्रफीत लोकांपुढे आणली. अशक्यप्राय भासतील अशी फेकाफेकीची कौशल्ये पाहून प्रेक्षक अचंबित झाले. छत्री, चमचे, बाटल्या, चाव्या यांसारख्या वस्तूंना झटका देऊन उडवल्यावर त्या अचूकपणे योग्य त्याच जागी जाऊन स्थिरावतात हे पडद्यावर पाहणे म्हणजे एक सुखद अनुभव आहे. त्यासाठी अचाट कल्पनाशक्ती तर आवश्यक आहेच, पण सराव व कौशल्याचीही गरज आहेच. मात्र सर्व करामती नेहमीच्या जीवनात कधीही करून दाखविणे त्या दोघांनी अशक्यच अहे.
पहिल्या प्रयत्नाला मिळालेल्य अभूतपूर्व प्रतिसादमुळेच त्यांनी या छंदाला व्यावसायिक रूप दिले व आणखी अशाच व्हिडीओ फिल्म स्वतःच्या संकेतस्थळावर मांडून ठेवल्या
Leave a Reply