राज कपूरने तिच्या १३ व्या वर्षीच तिच्यातील अभिनय गुणांची दखल घेतली, आणि १९७३ मध्ये प्रदर्शित झालेल्या बॉबी सिनेमात एका तरुण युगुल प्रेमकथेत अभिनेत्री म्हणून जगासमोर आणले. त्यांचा जन्म ८ जून १९५७ रोजी झाला. तिने बॉबी ब्रिगेंझा नावाच्या मध्यमवर्गीय अँग्लो इंडियन मुलीची भूमिका केली होती, ऋषीकपूरची प्रमुख भूमिका असणारा हा पहिलाच चित्रपट होता.”बॉबी” हा एक व्यावसायिकदृष्ट्या गाजलेला आणि टिकाकारांनी नावाजलेला चित्रपट होता. डिंपलच्या अभिनयाची विशेष दखल घेतली गेली आणि त्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार डिंपलला जया भादुरीसोबत अभिमान चित्रपटासाठी विभागून दिला गेला. बॉबीच्या यशापाठोपाठ डिंपल तरूण वर्गाची एक फॅशन आयकॉन बनली. बॉबी प्रदर्शित होईपर्यंत डिंपलचा राजेश खन्ना बरोबर वयाच्या १६ व्या वर्षीच विवाह झाला होता आणि नंतर मुलांच्या संगोपनासाठी ती चित्रपटांपासून दूर गेली. राजेश खन्नापासून १९८२ मध्ये विभक्त झाल्यानंतर, तिने चित्रपट सृष्टीत परत येण्याचा विचार केला. पण या वेळी तिच्या अभिनयाचा कस लागणार होता.
१९८४ मध्ये प्रदर्शित झालेल्या रमेश सिप्पी यांच्या “सागर” मध्ये काम केले. सिप्पींच्या एका मित्राने डिंपल पुन्हा काम करण्यास उत्सुक असल्याचे त्यांना सांगितले. त्यांनी तिला स्क्रिन टेस्टसाठी बोलावले आणि ती पुन्हा अकदा रिशी कपूरसोबत रूपेरी पडद्यावर झळकली. “सागर” चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. डिंपलने आपल्या अभिनयातील विविधता सिद्ध करण्यासाठी आपल्या चित्रपट निवडित अधिक चोखंदळता दाखवली. ती कालांतराने अधिक गंभीर भूमिकेंमध्ये प्रेक्षकांसमोर आली आणि समांतर सिनेमांकडे वळली. “काश”, “द्रिष्टी”, “लेकिन” आणि “रुदाली” या समांतर सिनेमांमधील तिच्या भूमिकांसाठी तिची विशेष नोंद घेतली गेली. रुदालीसाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा समिक्षक फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. गर्दिश मधील तिची सहाय्यक भूमिका लक्षणिय ठरली आणि “क्रांतीवीर” मधील तिच्या भूमिकेसाठी तिला चौथा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. डिंपलने १९९० आणि २००० च्या दशकांत अधूनमधून काही चित्रपटांमधून अभिनय केला. “दिल चाहता है” आणि अमेरिकन निर्मिती असणाऱ्या लीला चित्रपटात महत्वाच्या भूमिकेंमध्ये दिसली. त्यानंतर “हम कौन है”,”प्यार मे ट्विस्ट, “फिर कभी”, “तुम मिलो तो सही”, “बिईँग सायरस”,”लक बाय चान्स”,”दबंग”, “पटियाला हाऊस” आणि “कॉकटेल” मध्ये सहाय्यक भूमिकेत दिसली.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply