मराठा दैनिकापासून त्यांनी आपल्या सिनेपत्रकारितेला आरंभ केला नंतर चतुरस्त्र लिखाण सर्व कालानुरूप ते करीत राहिले. माधवराव गडकरी हे लोकसत्ताचे संपादक झाल्यावर त्यांनी भालेकर यांना दूरदर्शन, सिनेमा यावर लोकसत्तेत लिहायला सांगितले. ते सिबा गायगी या कंपनीतून असिस्टंट जनरल मॅनेजर म्हणून निवृत्त झाले होते. शिवाजी मंदिरच्या सांस्कृतिक कार्य परंपरेत त्यांचे मोलाचं योगदान होते. नाटक, मालिका, चित्रपट, साहित्य आणि सामाजिक क्षेत्रात त्यांचा मोठा मित्र परिवार होता.श्री शिवाजी मंदिरचे अध्यक्ष आणि कलर वाहिनीवरील कॉमेडी एक्स्प्रेस चे निर्माते, दिग्दर्शक ज्ञानेश भालेकर आणि गीतसुगंध या संगीताच्या कार्यक्रमाची सर्वेसर्वा अक्षदा विचारे यांचे ते वडिल होत.
शशिकांत भालेकर यांचे २९ मे २०२० निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply