चित्रपट अभ्यासक आणि सिने पत्रकार धनंजय कुलकर्णी यांचा जन्म ११ जूनला झाला.
धनंजय कुलकर्णी हे मेकॅनिकल इंजिनियर असून पुण्याच्या ए आय एस एस एम एस अभियांत्रिकी महाविद्यालयात कार्यरत होते. तसेच त्यांनी मास्टर्स इन जर्नालिझम केले असून विद्यापीठात पहिला क्रमांक मिळवित लोकमान्य टिळक पुरस्काराचे मानकरी होते. गेली तीस ते पस्तीस वर्षे धनंजय कुलकर्णी हे महाराष्ट्रातील विविध नियतकालिकांतून चित्रपट आणि चित्रपट संगीतावर लिखाण करीत आहेत. त्यांचे ‘अनमोल रतन – दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते’ हे पुस्तक जेष्ठ साहित्यिक डॉ यु म पठाण यांच्या हस्ते प्रकाशित झाले होते. तसेच ‘किस्से सिनेमातले ‘हे पुस्तक प्रदीप भिडे यांच्या हस्ते प्रकाशित झाले होते. या पुस्तकाला ‘साहित्य गौरव’ हा पुरस्कार प्राप्त झाला होता.
भारतीय सिनेमाच्या शतक महोत्सवाच्या निमित्ताने प्रकाशित झालेल्या ग्रंथात धनंजय कुलकर्णी यांचा सहभाग होता. हिंदी सिनेमाचे जेष्ठ गीतकार साहीर लुधियानवी यांच्या जन्मशताब्दी निमित्त त्यांनी लिहिलेल्या ‘ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्या है…’ या इ बुक ला जगभरातून मोठा प्रतिसाद मिळाला. सध्या’नवरंग रुपेरी’ या दिवाळी अंकाचे निवासी संपादक आहेत . तसेच गेली पंचवीस वर्षे या अंकाची लीड स्टोरी लिहित आहेत. या वर्षीच्या पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेत त्यांचा सहभाग होता.
धनंजय कुलकर्णी हे सकाळ, लोकसत्ता, पुढारी, लोकमत सोबतच प्रीमियर, तारांगण या अंकातून चित्रपट विषयी स्तंभ लेखन करीत असतात. त्यांनी पुण्यातील अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्र संचालन व निवेदन केले आहे. तसेच खाजगी रेडिओ एफ. एम. वर अनेक चित्रपट विषयक कार्य क्रमाचे सादरीकरण केले आहे.चित्रपट विषयक अनेक वेब पोर्टल वर ते लिखाण करीत असतात.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply