फिल्मकार सईद अख्तर मिर्जा यांचा जन्म ३० जून १९४३ रोजी मुंबई येथे झाला.
सईद अख्तर मिर्जा हे समांतर चित्रपटासाठी ओळखले जातात. त्यांनी आपल्या करीयरची सुरुवात मुंबई एका जाहिरात संस्थेत कॉपी रायटर म्हणून केली. त्यांच्या सिनेमा वा माहितीपटांमागे त्यांचे विचार वा ठाम भूमिका असे. त्यांच्या आपल्या करियरचा पहिला चित्रपट अरविंद देसाई यांच्या “अजीब दास्तान” ला फिल्मफेयर क्रिटिस अवॉर्ड फॉर बेस्ट मूवी ने सम्मानित केले गेले होते.
८० च्या दशकात सईद अख्तर मिर्जा यांचे ‘अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है’, ‘मोहन जोशी हाजिर हों’ व ‘सलीम लंगड़े पर मत रो’ हे चित्रपट गाजले होते तसेच त्यांच्या दूरदर्शन वरील धारावाहिक ‘नुक्कड़’ व ‘इंतजार’ या मालिका लोकांना आवडल्या होत्या.
१९९५ साली त्यांनी आपला शेवटचा चित्रपट ‘नसीम’ बनवला. ‘नसीम’ हा चित्रपट बाबरी मशीद पाडल्या नंतरच्या सामाजिक वातावरण व राजनीतिक परिवर्तनावर होती.
ते जेवढे प्रखर फिल्मकार आहेत, तेवढेच ते संवेदनशील लेखक आहेत. त्यांचे “अम्मी: लैटर टू ए डेमोक्रेटिक मदर” हे पुस्तक खूपच गाजले.
सईद अख्तर मिर्जा हे एशियन अकादमी ऑफ फिल्म अंड टेलीव्हीजनचे आजीवन सदस्य आहेत.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply