ललित लेखक मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष यांचा जन्म ७ जून १९१३ रोजी झाला.
डॉ. मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष हे ज्येष्ठ समीक्षक आणि ललित लेखक म्हणून ओळखले जात असत. ‘पुरुषराज अळुरपांडे’ असं काहीसं विक्षिप्त नाव घेऊन काही लेख बडोद्याच्या अभिरुची मासिकांत येत असत. गंमत म्हणजे ते नाव घेऊन लिहिणारी एक व्यक्ती नसून तीन जण होते. ते म्हणजे – पु. ल. देशपांडे, रा.वा.अलूरकर आणि मं. वि. राजाध्यक्ष!
साहित्य, संगीत, नाटक अशा आवडत्या विषयांवर तिघांच्या आपसांतल्या गप्पांमधून जन्म घेणारे हे लेख त्या काळी लोकांना भारीच पसंत पडले होते. राजाध्यक्ष यांनी रत्नाकर, संजीवनी, चित्रा, प्रतिभा, ज्योत्स्ना, समीक्षक अशा मासिकांमधून वेगवेगळ्या नावांनी लेख लिहायला सुरुवात केली होती. शमा आणि निषाद यांचं ‘वाद-संवाद’ हे सदर लोकप्रिय होतं. त्यातले शमा होते द. ग. गोडसे आणि निषाद होते राजाध्यक्ष! हे खुमासदार आणि लज्जतदार सदर अनेक वर्षं चाललं होतं. त्यांनी टाइम्स ऑफ इंडिया, इलस्ट्रेटेड वीकली, बॉम्बे गॅझेटियरसाठी इंग्लिशमधूनही भरपूर लेखन केलं. मनमोकळे, निवडलेले खर्डे, शालजोडी, वाद-संवाद, पाच कवी, खर्डेघाशी, आकाशभाषिके, अमलान, पंचम, पाक्षिकी, शब्दयात्रा अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. ज्ञानपीठ पुरस्कार समिती आणि साहित्य अकादमीचे ते अनेक वर्षं सदस्य होते. मंगेश राजाध्यक्ष हे विजया राजाध्यक्ष यांचे ते पती होत.
डॉ. मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष यांचे १९ एप्रिल २०१० रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply