नवीन लेखन...

पहिला विमान प्रवास

आपण आयुष्यात अनेकवेळा काही ना काही कारणाने प्रवास करत असतो. प्रवास करणेसाठी वेगवेगळ्या वाहनांचा वापर करत असतो. आयुष्यातील प्रत्येक प्रकारच्या प्रवासाची गम्मत काही औरच असते. लहान असताना आई वडीलांचे बरोबर बैलगाडी, एस.टी. ने केलेला प्रवास. पहिल्यांदा केलेला रेल्वे प्रवास हे त्या त्या वेळी अनोखा आनंद देऊन जातात. लहानपणी आपण सायकल चालवायला शिकल्यानंतर कोणाचेही मदतीशिवाय एकट्याने सायकल चालवली त्याचा आनंद हा त्या वेळचा सर्वोच्च आनंद असतो . त्या नंतर मोठे झाल्यावर स्कूटर मोटार सायकल चारचाकी गाडी शिकल्या नंतर चार चाकी गाडी चालवत केलेला पहिला प्रवास असेे प्रवासाचे आनंदाचे अनेक टप्पे असतात.

माझे लहानपण माण तालुक्यातील शिंदीखुर्द या मुळ गावी तसेच कोरेगाव तालुक्यातील भाडळे या अजोळी गेले.साधारण तो ५० वर्षा पुर्वीचा काळ. त्या वेळेस साधे रस्ते धड नसत व दिवसात एखादी एस.टी. गावात येत असे. तेव्हा एस.टी. मधून दणके खात केलेला प्रवास सुध्दा खुपच आनंद देऊन जायचा. अशा गावात राहिल्याने कधीकाळी आपण विमान प्रवास करु हे कधी स्वप्नातही वाटले नव्हते. पुढे कालांतराने मी सातारा सारख्या शहरात रहायला आलो व तिथेच संपुर्ण शिक्षण नोकरी करत स्थाईक झालो. आर्थिक स्थर ऊंचावल्याने स्वताची स्कुटर, मोटारसायकल, चारचाकी वाहन घेऊन त्या वाहनातून भरपुर प्रवास सुध्दा केला पण कधी विमान प्रवाकरण्याचा योग आत्तापर्यंत आला नाही. किंबहूना तसे कधी स्वप्नात सुध्दा वाटले नाही. ६० वर्षे पुर्ण झाली व नोकरीतून निव्रूत्त झालो तरीही विमान प्रवासाचा योग काही जुळुन आला नाही.

अशा या दुर्मिळ विमान प्रवासाचा योग माझ्या ४ महिन्याच्या नाती मुळे आज रोजी घडुन आला. मुलगी व जावई हे बंगलोर मुक्कामी असतात. त्यामुळे नातीचे जन्मा नंतर मुलगी व नात यांना बंगलोरला त्याचे घरी सोडण्यचे निमित्ताने आज पहिल्यांदा विमान प्रवास केला. पहिलाच विमान प्रवास असल्याने थोडी ऊत्सुकता व थोडी भिती अशी संमीश्र भावना होती. त्यात मला स्वतःला थोडा अस्थम्याचा त्रास असल्याने ईतक्या ऊंचीवर आपला त्रास वाढेल काय अशी एक मनात भिती होती.

सकाळी १०:४५ वाजता पुण्यहुन बंगलोर साठी विमान होते. त्यामुळे वेळेवर पुणे विमानतळावर पोहोचण्यासाठी सकाळी ८ वाजता पुणे येथील धायरी येथील फ्लॅट मधून मुलाचा निरोप घेऊन निघालो व ठिक ९:१५ वाजता विमानतळावर पोहोचलो. चेकिंग साठी मधे अर्धा तास वेळ असल्याने आधी पोटपुजा केली व चेकीग साठी रांगेत नंबर लावला.मुलगी व जावई यांनी विमान प्रवास केला असल्याने त्यांना विशेष नाविन्य नव्हते. माझा व माझे पत्नीचा हा पहिला प्रवास असल्याने सर्वच बाबतीत अनभिज्ञ होतो. त्यामुळे तेथील सिक्युरिटी, सामानाचे चेकींग, या सर्वच गोष्टी मजेशीर वाटत होत्या. अखेर चेकींगचे सर्व सोपस्कार पुर्ण होऊन विमानात पहिले पाऊल टाकले व पहिल्या विमान प्रवासास सुरुवात झाली. पहिलाच विमान प्रवास असल्याने नाही म्हणले तरी छातीत थोडीशी धडधड होतीच. वैमानिक व विमान सुंदरी यांनी सुरक्षाविषयक विविध सुचना दिल्या व विमानाने आकाशात झेप घेतली. व हळूहळू विमान विषिष्ट उंचीवर जाऊन स्थिरावले. त्या नंतर मनातील भीतीची भावना कमी होत गेली व त्याची जागा उत्सुकतेने घेतली. हवा छान होती त्यामुळे बाहेरचे निसर्ग सौंदर्य अत्यंत विलोभनीय असे होते. पावसाळी हवामानात ढगांची दाटी होती व विमानाच्या खिडकीतून हे बाहेरील निसर्ग सौंदर्य न्याहाळणे यांचा आनंद काही अवर्णनीय असाच होता. त्या आनंदाचा अनुभव घेतच बंगलोर केव्हा आले ते कळलेच नाही व बरोबर १२:१५ वाजता विमान बंगलोर येथील धावपट्टीवर उतरले व विमानातून बंगलोर विमानतळावर पाऊल टाकले व माझ्या पहिल्या वहिल्या विमान प्रवासाने माझ्या विमान प्रवासाचा श्रीगणेशा झाला.

सुरेश काळे
२ सप्टेंबर २०१७

सुरेश गोपाळ काळे
About सुरेश गोपाळ काळे 48 Articles
मी आयडीबीआय या बँकेच्या सेवेतून अधिकारी म्हणून जुन २०१७ मधे निवृत्त झालो. महाविद्यालयीन जीवनापासून काव्य लेखनाची आवड होती. नोकरीतील व्यापामुळे मधील काही वर्ष लेखन कमी होते. निवृत्तीनंतर त्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. विविध विषयांवर वैचारिक लेख लिहून ठेवले आहेत. परंतु लेख लिहिण्यापेक्षा कविता लिहिण्यामागे जास्त कल आहे. जुन २०१७ मधे "शब्दसूर" हा काव्यसंग्रह प्रकाशित.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..