नवीन लेखन...

रामदासस्वामींचा सार्वजनिक गणेशोत्सव

First Ganeshotsav in Maharashtra by Ramdas Swami

भाद्रपद शुध्द चतुर्थीला गणेश चतुर्थी असे म्हणतात तर माघ महिन्याच्या चतुर्थीच्या दिवसाला असलेले महत्व गणेश जयंती असे आहे. मात्र, यावेळी महाराष्ट्रातील पहिल्या गणेशोत्सवाची सांगता झाली, असे इतिहासात वर्णन आढळून येत आहे.

‘विजापूरचा सरदार अफझलखान याने शिवाजी राजांच्याप्रांती येऊन कान्होजी जेध्यास आपल्या मदतीस येण्याचा हुकूम पाठविला. यवनी सत्तेच्या आक्रमणामुळे शिवरायांच्या जिवितास असलेला धोका पाहता यामुळे समर्थांनी आनंदवनभुवनी स्वयंभू शिवथरघळीमध्ये १६५८ साली रचलेली ‘सुखकर्ता दु:खहर्ता। वार्ता विघ्नाची।… संकटी पावावे। निर्वाणी रक्षावे।’ ही आरती नसून समर्थांनी शिवरायांच्या रक्षणासाठी केलेला नवसच होता.

१६५९ साली अफझलखान प्रतापगडाच्या पायथ्याशी मारला गेला. १६७४ साली राज्याभिषेक झाला आणि १६७५ साली हा गणेशाचा नवस सुंदरमठामध्ये गणपतीची स्थापना करून फेडला गेला. ‘याच सुमारास समर्थ १५७१ चे आषाढात समर्थ पंढरपुरास जाऊन आले आणि भाद्रपदमासी, ‘समर्थे सुंदरमठी गणपति केला। दोनी पुरूष सिंधुरवर्ण अर्चिला। सकळ प्रांतासि मोहोछव दाविला। भाद्रपदमासपर्यंत॥’ हा उल्लेख भाद्रपद-माघपर्यंत असा असल्याचा गिरिधरस्वामींच्या समर्थप्रताप ग्रंथामध्ये दिसून येतो.

समर्थांनी शिवाजी महाराजांना ११ मुठी धान्य पाठवा, असा उल्लेखही दिसून येतो. या ११ मुठी समर्थांनी हनुमानाच्या मुठी गृहित धरल्या असाव्यात हे उमजलेल्या शिवाजी राजांनी १२१ खंडी धान्य पाठविले. सरासरी दररोज ६७५ किलो धान्य दिवसाला महाप्रसादासाठी लागल्यास प्रतिदिनी ९५०० लोक येथे येऊन महाप्रसादास आले. यामुळेच कोकणात गणेशोत्सव सर्वत्र पोहोचला असावा, हे जाणवते.

ज्याप्रमाणे गणपतीची आरती ही समर्थ रामदास स्वामींची असल्याचे ‘दास रामाचा वाट पाहे सदना।’ यावरून सांगितले जाते. त्याचप्रमाणे हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रातील सर्वात पहिला सर्वात मोठा गणेशोत्सव सुंदरमठामध्ये समर्थांनी करून संकटी पावलेल्या आणि शिवछत्रपतींना निर्वाणी रक्षिणाऱ्या सुरवरवंदनाचा नवस फेडला.

यानंतर लोकमान्य टिळकांनी पारतंत्र्य काळात या गणेशोत्सवाला ब्रिटीश सरकारविरूध्द जनतेत असंतोष पेरण्यासाठी सार्वजनिक उत्सवाचे स्वरूप आणले. मात्र, गणपतीची आरती समर्थांची तसाच गणेशोत्सवाची सुरूवातही समर्थांचीच असल्याचे समर्थ वाङमयातून स्पष्ट होत आहे.

IMG-20150916-WA0026

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..