कुशाभाऊ ठाकरे यांचा जन्म १५ ऑगस्ट १९२२ रोजी मध्यप्रदेशातील धर जिल्ह्यात झाला.
देशाच्या राजकारणात भाजपाला या पदाला आणण्यामध्ये कुशाभाऊ ठाकरे यांचे विशेष योगदान आहे. १९८० साली मध्य प्रदेशातील खंडवा संसदीय मतदारसंघातून ठाकरे यांनी लढवली. त्यांना पराभूत करण्यासाठी इंदिरा गांधींनी जबाबदारी स्वीकारली व खांडवामध्ये तीन दिवस प्रचार केला होता. त्यांनी मध्य प्रदेशातील खांडवा येथून लोकसभेवर प्रतिनिधित्त्व केले होते. कुशाभाऊ ठाकरेजीजी आपल्या साधेपणासाठी प्रसिद्ध होते.
बाह्य़ जगासाठी भाजपमधील संघटनमंत्री या पदाला फारसे महत्त्व नसले तरी, कुशाभाऊ ठाकरे यांच्यासारख्या नेत्यांमुळे या पदाची प्रतिष्ठा अधिक वाढली. भाजपच्या ११, अशोका रस्त्यावरील केंद्रीय कार्यालयातील एका लहानशा खोलीत कुशाभाऊ ठाकरे राहत असत. तेथूनच ते देशभरातील भाजपचा गाडा हाकत.
नरेंद्र मोदी दिल्लीत असताना त्यांचा मुक्काम याच खोलीत असत. कुशाभाऊ ठाकरे हे भारतीय जनता पक्षाचे ४ थे अध्यक्ष तसंच या पक्षाचे पहिले मराठी राष्ट्रीय अध्यक्ष होते. त्यांनी १९९८ ते २००० या कालावधीत पक्षाचे अध्यक्षपद भूषविले. कुशाभाऊ ठाकरे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी १९४२ पासून निगडित होते.
मध्य प्रदेशातील निमंच येथून त्यांनी संघप्रचारक म्हणून सुरुवात केली. भाजपाच्या स्थापनेपूर्वी ते भारतीय जनसंघाचे सक्रीय नेते होते. आणिबाणीच्या काळात त्यांनी १९ वर्षे तुरुंगवास सोसला. कुशाभाऊ ठाकरे यांचे २८ डिसेंबर २००३ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply